ठाण्यातील ‘त्या’ मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींची जामीनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:19 PM2020-04-15T22:19:57+5:302020-04-15T22:32:03+5:30

वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपावरुन ठाण्यातील एका अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणातील सहाही आरोपींना ठाणे न्यायालयाने काही अटींवर तत्वत: जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यापैकी दोघा कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित चौघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

 All the accused in Thane beating case released on bail | ठाण्यातील ‘त्या’ मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींची जामीनावर सुटका

दोघांवर कोरोनाचे उपचार सुरु

Next
ठळक मुद्दे दोघांवर कोरोनाचे उपचार सुरुचौघांना ठेवले विलगीकरण केंद्रामध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणातील सहाही आरोपींची तत्वत: जामीनावर सुटका झाली आहे. त्यांच्यापैकी दोघा कोरोनाग्रस्तांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित चौघांना भार्इंदर पाडा येथील ठाणे महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती बुधवारी पोलीस सूत्रांनी दिली.
मारहाण प्रकरणामध्ये आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेल्या पाच जणांना वर्तकनगर पोलिसांनी सुरुवातीला ९ एप्रिल रोजी अटक केली होती. तर सहावा आरोपी ११ एप्रिल रोजी त्याच्या स्कॉर्पिओसह शरण आला होता. अटक होण्यापूर्वीच या सर्वांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल १२ एप्रिल रोजी आला. दरम्यान, या सर्वांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. दोघांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मात्र वर्तकनगर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ठाणे न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब पोलिसांनी आणून दिल्यानंतर न्यायालयानेही सोमवारीच या सर्वांना काही अटी शर्थींवर तत्वत: जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यातील दोघांना घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर उर्वरित चौघेही त्या दोघांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचा ‘हायरिस्क’मध्ये समावेश झाला आहे. त्यांनाही विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा सल्ला ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. याच आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरण केंद्रात तर आठ पोलिसांना होम कॉरंटाईन अर्थात घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे एखादा आरोपी पकडण्यासाठी किंवा त्याला अटक करतांनाही पोलिसांना यापुढे मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Web Title:  All the accused in Thane beating case released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.