सर्व कलाप्रकारांना ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:31+5:302021-03-13T05:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांत विपरीत परिणाम झाला आहे, याचा फटका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांत विपरीत परिणाम झाला आहे, याचा फटका सर्वच कलाप्रकारांना बसलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या संस्थांवर अनेक लोक अवलंबून असतात. सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत सर्व संस्थांना आर्थिक दिलासा मिळावा, म्हणून ठाण्यातील नाट्यगृहांमध्ये सादर होणाऱ्या नाटकांसाठी नाट्यगृहाच्या मूळ भाड्याच्या केवळ २५ टक्के भाडे आकारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने यापूर्वीच घेतला आहे. मात्र, आता नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी तो लागू करून प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले.
यामुळे आता नाटकांसह मराठी वाद्यवृंद, लोककला आणि इतर सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही सवलत देण्याची नाट्यगृह व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.