डाेंबिवली रेल्वेस्थानकाशी संलग्न सर्व प्रवेशद्वार उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:37+5:302021-06-23T04:26:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : रेल्वेस्थानकालगत पूर्वेला डॉ. राथ रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे आमदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रेल्वेस्थानकालगत पूर्वेला डॉ. राथ रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी तातडीने स्कायवॉकला समांतर असलेली रेल्वेचे सर्व प्रवेशद्वार खुले करण्याची सूचना केली. या सूचनेनंतर तातडीने मंजूर करून रेल्वेने नुकतेच सर्व पूल प्रवाशांसाठी खुले केले.
लॉकडाऊनमध्ये रेल्वेने स्थानकातील तीन पादचारी पुलांपैकी केवळ मधला पूल खुला ठेवला होता. अन्य ठिकाणी पत्रे लावून प्रवेशद्वारे बंद केली होती. नागरिकांना पूर्व-पश्चिम ये-जा करता येत असली तरी फलाटावर येण्यासाठी त्यांना मधल्या पुलावर ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळत होता. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राथ रस्त्यावर पाणी साचले. त्यावेळी अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. त्यानंतर नागरिकांचा जीव महत्त्वाचा असून, स्कायवॉकची सर्व प्रवेशद्वारे खुली करावीत, असे चव्हाण यांनी विभागीय व्यवस्थापकांना सुचवले होते. त्यानुसार त्यांनी तातडीने सगळी प्रवेशद्वारे खुली केल्याच्या माहितीला स्थानक प्रबंधक एस.के. चांद यांनी दुजोरा दिला.