निवडणूक आराखड्यावर सर्व पक्षांच्या हरकती
By admin | Published: January 9, 2017 07:29 AM2017-01-09T07:29:14+5:302017-01-09T07:29:14+5:30
महापालिका निवडणुकीसाठी ९० नगरसेवकांसाठी २३ प्रभागांची निर्मिती करत प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रभाग आराखडा जाहीर करताना
भिवंडी : महापालिका निवडणुकीसाठी ९० नगरसेवकांसाठी २३ प्रभागांची निर्मिती करत प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रभाग आराखडा जाहीर करताना निवडणूक अधिकारी श्रीकांत औसरकर यांनी शहराची भौगोलिक परिस्थिती नजरेसमोर न ठेवता प्रभागांच्या सीमा आराखड्यात घेताना चुकीच्या पद्धतीने घेतल्या. यामुळे प्रभागरचनेचा गोंधळ झाला. त्यावर, शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हरकती दाखल केल्या आहेत.
प्रभागांची निर्मिती करताना शहरातील मोठे रस्ते,गल्ली, नाले,डोंगर,लहान रस्ते, उड्डाणपूल यांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्याकडे डोळेझाक करून प्रभागनिर्मिती जाहीर केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात महापौर तुषार चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक अशा ३४ जणांनी हरकती पालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्या आहेत.
वाढत्या हरकतींमुळे निवडणूक आयोग व पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मान्यतेने गुगलद्वारे प्रसिद्ध केलेला प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून या हरकतींवर आयुक्त व निवडणूक आयोग कुठला निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीसाठी नुकतेच जातीनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानंतर नियोजित कार्यक्र मानुसार पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांसाठी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला आहे. पालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या तसेच त्याची व्याप्ती आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांची माहिती दिली आहे. तसेच २३ प्रभागांच्या सीमांचे नकाशे प्रसिद्ध केले आहेत. हा आराखडा पाहून पालिका क्षेत्रातील विविध नागरिकांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांनी हरकती घेऊन तक्र ारी अर्ज पालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. या तक्र ारींमध्ये १८ नागरिक, १३ नगरसेवक व ३ सामाजिक संस्था असे एकूण ३४ अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)