सगळे कायदे खुंटीला टांगले गेले आहेत, ऋता आव्हाड यांची टीका

By जितेंद्र कालेकर | Published: November 11, 2022 08:50 PM2022-11-11T20:50:05+5:302022-11-11T20:50:23+5:30

पोलीस व्हॅन रोखण्याचा प्रयत्न: पोलीसांचा सौम्य लाठीहल्ला

All the laws have been hung, says Rita Awad | सगळे कायदे खुंटीला टांगले गेले आहेत, ऋता आव्हाड यांची टीका

फोटो : विशाल हळदे

Next

ठाणे: सगळे कायदे हें खुंटीला टांगले गेले आहेत. जर काहींचं मिळालं नाही. तर काहीतरी शोधून काढून अटकवण्याचा प्रयत्न केला जातो. सगळं जाणीवपूर्वक केलं जातं आहे. पोलीस त्यांचे काम करीत आहेत, अशी प्रतिक्रीया राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्या तथा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी व्यक्त केली. तर जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना नियमानुसार शिक्षा होईल. पोलीसही नियमानुसार काम करीत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचा दबाव टाकलेला नसल्याचा दावा ठाण्याचे पालकमंत्री शुंभराजे देसाई यांनी केला.

आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता यांनी त्यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाऊन शुक्रवारी सायंकाळी भेट घेतली. या भेटीनंतर बाहेर आल्यावर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, सगळे कायदे हे खुंटीला टांगले गेले आहेत पोलीस त्यांचे काम करत आहेत. चित्रपटगृहातील कर्मचाºयांवर दबाव टाकून त्यांना जबाब दयायला सांगितले जात असल्याचा आरोपही ऋता यांनी केला. दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास डॉक्टरांचं एक पथक वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल झालं. या डॉक्टरांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अटक बेकायदेशीर- अ‍ॅड. प्रशांत कदम
आव्हाड यांना ज्या कलमांन्वये अटक झाली. त्यामध्ये १४१ सारखी कलमे लावली गेली. यातही अटकेच्या आधी तशी रितसर माहिती देणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत कदम यांनी केला आहे.

आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचे कलम का नाही?
चित्रपटगृहामध्ये प्रेक्षक दाम्पत्यावरील हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली असली त्यांना मोकळे सोडणे समाजास घातक आहे. असे न करता आव्हाडांना साह्य करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यास उच्च न्यायालयाकडे दाद मागावी लागेल, असा इशारा देणारी नोटीस अभिनेत्री केतकी चितळे हिचे वकील योगेश देशपांडे यांनी केला आहे. या हल्ल्याच्या वेळी तक्रारदाराच्या पत्नीवर हात टाकण्याचा प्रयत्न झाल्याने विनयभंगासंबंधीचे कलम ३५४ तसेच कटकारस्थान केल्याने १२० ब देखील लागू आहे.आव्हाडांची सुटका झाल्यास सध्या फरार असलेले साथीदार इतर चित्रपटगृहांवरही असे हल्ले करण्याचा धोका असल्याचेही अ‍ॅड. देशपांडे यांनी म्हटले आहे.

Web Title: All the laws have been hung, says Rita Awad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.