मतदानासाठी सर्वांना मिळणार भरपगारी सुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:12 AM2019-04-17T01:12:21+5:302019-04-17T01:13:30+5:30

लोकसभेच्या निवडणुकीकरिता २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

All will be available for voting holidays | मतदानासाठी सर्वांना मिळणार भरपगारी सुटी

मतदानासाठी सर्वांना मिळणार भरपगारी सुटी

googlenewsNext

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीकरिता २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना वगळून इतर सर्व आस्थापनांचे कर्मचारी व अधिकारी यांना पगारी सुटी देण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी या सुटीच्या दिवसाची वेतनकपात करण्यात येणार नाही. याशिवाय, सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्यात याव्यात, असे आवाहन येथील कामगार उपायुक्तांनी केले आहे. पण, अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. यासाठी मात्र संबंधित आस्थापनांनी महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

Web Title: All will be available for voting holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.