भाजपाच्या सर्व्हेत झोल - डावललेल्यांचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:02 AM2017-08-11T06:02:46+5:302017-08-11T06:02:46+5:30

डावलल्या गेलेल्या उमेदवारांची आधीच बंडाचा पवित्रा घेतला असतानाच आता ज्या सर्व्हेच्या आधारे तिकीटवाटप झाले त्या सर्व्हेतच झोल झाल्याचा आरोप डावलल्या गेलेल्या उमेदवारांनी केला आहे.

 The allegations of Jawl-Tawlal of BJP were proved | भाजपाच्या सर्व्हेत झोल - डावललेल्यांचा आरोप  

भाजपाच्या सर्व्हेत झोल - डावललेल्यांचा आरोप  

Next

मीरा रोड : डावलल्या गेलेल्या उमेदवारांची आधीच बंडाचा पवित्रा घेतला असतानाच आता ज्या सर्व्हेच्या आधारे तिकीटवाटप झाले त्या सर्व्हेतच झोल झाल्याचा आरोप डावलल्या गेलेल्या उमेदवारांनी केला आहे. हा सर्व्हे कोणत्या निकषाच्या आधारावर केला आणि त्यातून काय निष्कर्ष हाती आले ते जाहीर करण्याची मागणी करून त्यांनी खळबळ उडवली आहे.
मीरा-भार्इंदरमधील भाजपाची उमेदवारी आमदार नरेंद्र मेहतांच्या मर्जीवर झाल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. मुख्यमंत्र्यांनीही या प्रक्रियेवर लक्ष ठेवल्याचे जाहीर केले होते. मग त्यांच्यासमोर कोणते मुद्दे मांडले गेले, सर्व्हेचे कोणते निष्कर्ष त्यांना सादर केले ते जाहीर करा म्हणजे तिकीटवाटप किती पारदर्शक झाले ते समोर येईल, असे आव्हान या बंडखोरांनी दिले आहे.
भार्इंदर पश्चिमेस प्रभाग १ मध्ये जुने भाजपा कार्यकर्ते आदेश अग्रवाल, महेंद्र मौर्या आदींना डावलून नव्याने आलेले मेहता समर्थक अशोक तिवारी व दरोगा पांडेना उमेदवारी दिली. भार्इंदर पूर्वेच्या शशिकांत भोईर यांच्या पत्नी सुनिता यांना थेट पश्चिमेस उमेदवारी दिली. प्रभाग ७ मध्ये रक्षा भूपतानी यांना उमेदवारी देत रोहिणी कदम या सर्व्हेमध्ये पुढे असतानाही त्यांना डावलले. प्रभागाशी संबंध नसणाºया दिपाली मोकाशी यांना तिकीट दिले. प्रभाग ६ मधून नव्याने आलेले ध्रुवकिशोर पाटील यांना, तर डॉ. रमेश जैन यांच्या पत्नीस उमेदवारी दिली. येथे तर डॉ. राजेंद्र जैन यांना पहिल्या क्रमांकावर तर महापौर गीता जैन यांना चक्क दुसºया क्रमांकावर दाखवले. प्रभागात नाव न ऐकलेल्या शिल्पा जैनही शर्यतीत होत्या.
प्रभाग ८ मध्ये नव्याने आलेले सुरेश खंडेलवाल, दिपाली कापडिया तसेच टँकर ठेकेदार गजेंद्र रकवी यांच्या पत्नीस उमेदवारी दिली. प्रभाग २३ मध्ये पूर्वेच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांना आणले. भार्इंदर पूर्वेला तर प्रभाग २ मध्ये नगरसेविका सुमन मेहता, माजी नगरसेवक दाम्पत्य मयेकर यांनी मेहतांच्या नाराजीमुळे शिवसेनेत प्रवेश केला. येथे दोन वेळा प्रतिनिधित्त्व केलेल्या नगरासेविका कल्पना म्हात्रे यांना डावलले आणि नव्याने आलेल्या शानू गोहिलसह नगरसेवक यशवंत कांगणे यांच्या पत्नीस उमेदवारी दिली. प्रभाग ५ मध्ये गटनेते शरद पाटील यांना आयत्यावेळी डावलून मेहता गटाचे राकेश शहा यांना तिकीट दिले. वर्षा भानुशालींना कात्रजचा घाट दाखवत मेघना रावल यांच्यासह मुन्ना सिंह व वंदना पाटील आदी सर्व मेहता समर्थकांना उमेदवारी मिळाली. प्रभाग ४ मध्ये मेहता समर्थक मधुनसुदन पुरोहित यांच्यासह सुनिला शर्मा, काँग्रेसमधून आलेल्या प्रभात पाटील यांना तिकीट दिले. गजानन भोईर यांनी तर नेत्यांचे वाभाडे काढले. भाजपाचे प्रेमनाथ पाटील सेनेत गेल्याने भोईर यांचा मुलगा गणेश याची लॉटरी लागली. माजी नगरसेवक भुदेका यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. प्रभाग १० मध्ये नव्याने आलेले मिलन पाटील, करकेरा, सावंतना तिकटी देत जुन्यांना डावलले.
वहिनी तथा नगरसेविका डिंपल मेहता, बार-लॉज चालक अरविंद शेट्टी, व्यावसायिक संबंध असलेले हसमुख गेहलोत; तर खारीगावातील डॉ. प्रिती पाटील या मेहता समर्थकांना प्रभाग १२ मध्ये कार्यक्षेत्र नसताना उमेदवारी दिली गेली. अरविंद शेट्टी यांचे नाव सर्व्हेमध्ये होते का? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रभाग १३ मध्ये सक्रिय महिला पदाधिकाºयांना डावलून नव्याने आलेल्या अभिनेता बबलू मुखर्जी यांच्या पत्नी अनिता यांना तिकीट दिले. प्रभाग १४ मध्ये मेहता विरोधक अनिल भोसलेंचा पत्ता मीरादेवी यादव यांच्यासाठी कापला. नव्याने आलेल्या सचिन म्हात्रे, ज्योत्स्ना हसनाळे यांना तिकीट दिले. प्रभाग १८ मध्ये दौलत गजरे हे जुने कार्यकर्ते आहेत; तर नीला सोन्स, विजय राय हे मेहता समर्थक मानले जातात. प्रभाग २० मध्ये तर मेहता विरोधक दिनेश जैन यांचे सर्व्हेत नाव पुढे असताना शिवसेनेतून आलेल्या प्रशांत दळवींना उमेदवारी देऊ केली. त्यामुळे जैन यांनी बंडाचा झेंडा फडकवला; तसेच मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्याने जैन यांना तिकीट दिले. पण त्यांची कोंडी करण्यासाठी भाजपाचे भावेश गांधी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. प्रभाग १७ मध्ये राजेंद्र मोरे, सुरेखा गायकवाड, किरण चेऊलकर आदी अनेकांचे पत्ते कापत प्रभागाबाहेरच्या शिवसेनेच्या दळवी यांना तिकीट दिले.

पक्षांतर्गत विरोधकांचे पत्ते कापले

एकंदरीतच जाहीर झालेल्या उमेदवारीवरुन भाजपाच्या चारही सर्व्हेबद्दल संशयकल्लोळ आहे. निम्म्यापेक्षा जास्त आयारामांना उमेदवारी देत जुन्या कार्यकर्त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे.
आमदार मेहता समर्थकांना झुकते माप दिले असले, तरी पक्षातील विरोधक व अडचणींच्या व्यक्तींचे पत्ते कापण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या निवडीवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असल्याचा भाजपाचा दावा पोकळ ठरल्याचा डावललेल्यांचा आरोप आहे.

पारदर्शकता दाखवा : भाजपाने उमेदवारीसाठी सर्व्हे केला होता, तर उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी काही उमेदवारांनी प्रचार कसा सुरु केला? असा त्यांचा सवाल आहे. निदान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर तरी उमेदवार निवडीचे निकष, सर्व सर्व्हेची पध्दत व अहवाल जाहीर करुन पारदर्शकता दाखवा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

आ. मेहता यांच्या समर्थकांना तिकीटवाटपात झुकते माप दिले, यात तथ्य नाही. पक्षाच्या चार सर्वेक्षणांनुसार मुख्यमंत्री तसेच पार्लमेंटरी बोर्डाने ठरवलेले उमेदवारच पक्षाने दिले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज मंडळी चुकीचा आरोप करत आहेत.
- हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजपा

Web Title:  The allegations of Jawl-Tawlal of BJP were proved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.