युतीतील तणावाचे पडसाद ‘स्थायी’त!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:52 AM2019-11-11T00:52:49+5:302019-11-11T00:52:59+5:30

शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याच्या परिस्थितीत असताना याचे पडसाद केडीएमसीत येऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत.

Alliance stress 'permanent'! | युतीतील तणावाचे पडसाद ‘स्थायी’त!

युतीतील तणावाचे पडसाद ‘स्थायी’त!

googlenewsNext

कल्याण : मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याच्या परिस्थितीत असताना याचे पडसाद केडीएमसीत येऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत. साधारण जानेवारीमध्ये स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. आमचाच सभापती असेल असा दावा आतापासूनच केला जाऊ लागल्याने संबंधित पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सामना होईल, अशी शक्यता आहे. त्यात नोव्हेंबरअखेरीस स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर गुरुवारी नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने समितीवर कोणाची वर्णी लागते? याकडेही लक्ष लागले आहे.
जयवंत भोईर, शालिनी वायले, सभापती दीपेश म्हात्रे, निलेश शिंदे, मनोज राय, नितीन पाटील, संदीप पुराणिक, कस्तुरी देसाई हे विद्यमान आठ सदस्य ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी निवृत्त होणाºया सदस्यांच्या रिक्त होणाºया जागांवर गुरुवारी दुपारी दोन वाजता नवीन आठ सदस्यांच्या नेमणुका करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी आक्टोबरमध्ये केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने नव्याने निवडून जाणाºया सदस्यांना केवळ नऊ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. तसाच कालावधी जानेवारीमध्ये निवडून येणाºया सभापतींनाही मिळणार आहे.
समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आठ, भाजप सहा आणि काँग्रेस, मनसे प्रत्येकी एक अशी १६ सदस्य संख्या आहे. ३० नोव्हेंबरला होणाºया निवृत्त होणाºया आठ सदस्यांमध्ये चार सदस्य शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि एक सदस्य मनसेचा आहे. त्यामुळे त्यांच्या जागी गुरुवारी नव्याने घेतल्या होणाºया सदस्यांमध्ये कोणाची वर्णी लागते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रक्रियेनंतर साधारण जानेवारीमध्ये नवीन सभापतीपदाची निवडणूक होईल. सध्या सभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यात पाच वर्षांच्या कालावधीत दोन-दोन वर्षे सभापतीपदाचे वाटप झाले होते. त्यामुळे पुढचा सभापतीही आमचाच असेल अशी भूमिका शिवसेनेची आहे. तर पाचव्या वर्षाचे काहीही ठरलेले नाही, पण महापौरपद आतापर्यंत उपभोगत असलेल्या शिवसेनेने सभापतीपद आम्हाला द्यावे, असे भाजपचे म्हणणे आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे जानेवारीत होणाºया सभापतीपदावरून स्थानिक पातळीवर दोघांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट
होत आहे.
राज्यस्तरावरील वादावरून येथील युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना चार वर्षांत दोघांमध्ये अनेक वाद झाले, पण त्याचा परिणाम केडीएमसीतील युतीवर झाला नाही असाही सूर शिवसेना-भाजपमधील एका गटाचा असला तरी आगामी समित्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने येथील सत्तेची समीकरणे कशी राहतील? हे लवकरच स्पष्ट होईल, याबाबतच चित्र लवकरच स्पष्ट होतील, असे सूत्रांनी सांगितले.
>सभापती आमचाच राहणार!
राज्यातील पहिले चित्र स्पष्ट होऊ द्या. त्याशिवाय इथले निर्णय होणार नाहीत. पण तिकडे कोणताही निर्णय झाला तरी आगामी सभापती शिवसेनेचाच बसेल. ठरल्याप्रमाणे दोन वेळेला सभापतीपद भाजपला देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पुढचे सभापतीपद मिळणार नाही. सभापती आमचाच राहणार आहे, असे कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले. तर चार वर्षात दोन वेळेला सभापतीपद मिळाले. पण आता शिवसेनेचे काहीही म्हणणे असू देत. पाचव्या वर्षात कोणाच्या वाट्याला सभापतीपद याबाबत काहीही ठरलेले नाही. सेनेने महापौरपद चार वर्षे भूषवले असल्याने आगामी सभापतीपद आम्हालाच मिळावे,असे भाजपचे नगरसेवक तथा माजी गटनेते वरुण पाटील यांनी सांगितले.

Web Title: Alliance stress 'permanent'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.