दिव्यांगांना केले निधीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:10+5:302021-03-05T04:41:10+5:30
किन्हवली : तालुक्यातील डोळखांब ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधीचा धनादेश येथील दिव्यांगांना देण्यात आला. प्रहार या संघटनेने सर्व ग्रामपंचायत ...
किन्हवली : तालुक्यातील डोळखांब ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधीचा धनादेश येथील दिव्यांगांना देण्यात आला. प्रहार या संघटनेने सर्व ग्रामपंचायत स्तरावर सरकारी निर्णयानुसार दिव्यांगांना पाच टक्के निधी वितरित करण्याची मागणी केली होती.
यानुसार या निधीचे वाटप केले जात आहे. ज्या ग्रामपंचायतींनी या निधीचे वाटप केले नसेल त्यांनी ते करावे, असे आवाहन प्रहार संघटनेने केले आहे.
डोळखांब ग्रामपंचायत हद्दीतील अनिल चौधरी, सुनील फर्डे, किरण डोहळे, शरीफा शेख, एकनाथ रसाळ, अमिना शेख, प्रणया घनघाव, अजय घनघाव यांना निधी देण्यात आला. तीन हजार ७५० रुपयांचा धनादेश दिला. या वेळी सरपंच सुधाकर वाघ, उपसरपंच करुणा चौधरी, माजी सरपंच सुवर्णा भला, सदस्य रवी फर्डे, संतोष गायकवाड, भीमा वाघ उपस्थित होते.