आधीच तीव्र टंचाई त्यात पाणीही दूषित
By admin | Published: April 18, 2017 06:35 AM2017-04-18T06:35:50+5:302017-04-18T06:35:50+5:30
कल्याण ग्रामीण भागात वाड्यापाड्यांतील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने घोटभर पाण्याकरिता महिला, मुलांची परवड सुरू असतानाच सध्या
संजय कांबळे , बिर्लागेट
कल्याण ग्रामीण भागात वाड्यापाड्यांतील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने घोटभर पाण्याकरिता महिला, मुलांची परवड सुरू असतानाच सध्या जे पाणीसाठे उपलब्ध आहेत, त्यातील १४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
कल्याण ग्रामीण भागातील बारवी, काळू, उल्हास आणि भातसा नदीवर अवलंबून रायते प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना, काळू नदीवरील खडवली योजना आणि बारवी नदीवरील दहागाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना अशा ३ योजना, ५८ स्वतंत्र नळपाणीयोजना, शिवाय २७२ बोअरवेल आणि १५० विहिरींतून अडीच ते तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
कडक उन्हामुळे विहिरी व बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. झरे, तळी, तलाव कधीच आटले आहेत. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
जानेवारीमध्ये कल्याण ग्रामीण भागातील १६६ वाड्यापाड्यांतील ७८ ठिकाणचे पाणी तपासणीसाठी पाठवले होते. दहागाव, आजदे, निळजे आणि खडवली या तीन आरोग्य केंद्रांतून पाण्याचे नमुने घेतले होते.