मीरा रोडमध्ये होणार अमर जवान स्मारक, कौस्तुभ राणेंच्या बलिदानातून प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:09 AM2019-01-09T04:09:14+5:302019-01-09T05:30:27+5:30

हिमेश शहा यांची माहिती : शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या बलिदानातून मिळाली प्रेरणा

Amar Jawan Memorial in Mira Road, Inspiration From Kaustubh Rane's Sacrifice | मीरा रोडमध्ये होणार अमर जवान स्मारक, कौस्तुभ राणेंच्या बलिदानातून प्रेरणा

मीरा रोडमध्ये होणार अमर जवान स्मारक, कौस्तुभ राणेंच्या बलिदानातून प्रेरणा

googlenewsNext

भाईंदर : काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मीरा रोडचे सुपूत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याने त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा मिळालेले हिमेश शहा सृष्टी परिसरातील सेक्टर तीन गृहसंकुलाच्या मैदानात आपले सहकारी व सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या सहकार्याने अमर जवान स्मारक १५ जानेवारी रोजी लष्कर दिनाचे औचित्य साधून साकारणार आहे.

प्रत्येकाच्या मनात देशप्रेम कायम जागृत रहावे, त्यांचा उर शहीद जवानांच्या त्यागामुळे सतत अभिमानाने भरून यावे, असा उद्देश यामागे असल्याचे शहा यांनी सांगितले. देशाच्या सीमेवर जवानांचा खडा पहारा असल्यानेच आपण सुरक्षित असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून त्यातूनच शहीद स्मारक साकारण्याच्या संकल्पनेने अनेक वर्षांपासून डोक्यात चळवळ उभी केली होती. त्यातच गेल्यावर्षी मीरा रोड येथील मेजर राणे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले. जवानांच्या बलिदानानंतर अथवा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिनावेळीच नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना उफाळून येते. या मर्यादित देशभक्तीला कायमस्वरूपी तेवत ठेवण्यासाठी त्यांनी स्मारक साकारण्याची संकल्पना आपले सहकारी तसेच सृष्टी गृहसंकुल फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यांना शहा यांची संकल्पना आवडल्याने त्यांनी गृहसंकुलातीलच मैदानात स्मारक साकारण्यास शहा यांना परवानगी दिली. याच गृहसंकुलात लष्करातून निवृत्त झालेले २१ जवान वास्तव्य करत असून त्यांची माहिती शहराला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्मारकात अमर जवानाची साडेपाच फुटी प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांनी दहिसर येथील मूर्तीकार किणी यांना सांगितले. जवानाची प्रतिकृती अंतिम टप्प्यात असून १५ जानेवारीच्या लष्कर दिनाचे औचित्य साधून त्याचे अनावरण वरिष्ठ नाविक अधिकारी (कोमोडोर) तथा मुंबई माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बिमन मेस्त्री यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
 

Web Title: Amar Jawan Memorial in Mira Road, Inspiration From Kaustubh Rane's Sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.