जपानमध्ये अमरजित पांडेला रजतपदक

By Admin | Published: August 30, 2016 02:45 AM2016-08-30T02:45:41+5:302016-08-30T02:45:41+5:30

जपान येथे झालेल्या दहाव्या जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये कल्याणच्या अमरजित पांडे याने चमकदार कामगिरी करीत देशाला रजतपथकाची कमाई करून दिली.

Amarjeet Pandeya silver in Japan | जपानमध्ये अमरजित पांडेला रजतपदक

जपानमध्ये अमरजित पांडेला रजतपदक

googlenewsNext

कल्याण : जपान येथे झालेल्या दहाव्या जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये कल्याणच्या अमरजित पांडे याने चमकदार कामगिरी करीत देशाला रजतपथकाची कमाई करून दिली. या जागतिक परीक्षेत २८ देशांतील तब्बल १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
२३ व २४ आॅगस्टला झालेल्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमरजितने रजतपदक प्राप्त केले. अमरजित याने आपले प्राथमिक शिक्षण कल्याणच्या के.सी. गांधी विद्यालयातून घेतले असून मुलुंड विद्यामंदिर महाविद्यालयात तो बारावीचे शिक्षण घेत आहे. जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये सहभागी होऊन मोठे यश मिळवणे, हे अमरजितचे स्वप्न होते.
त्याची दृढ इच्छाशक्ती पाहून त्याचे वडील विकास आणि आई पूनम यांनी त्याच्या इच्छाशक्तीला बळ दिले. त्याचप्रमाणे त्याच्या हुशारीची चुणूक पाहून मुलुंड विद्यामंदिर महाविद्यालयातील शिक्षकांनीदेखील त्याला मार्गदर्शन केले. जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याकरिता देशांतर्गत पात्रता परीक्षेला देशातून तब्बल साडेसहा हजार विद्यार्थी बसले होते. यामध्ये देशातून २२ विद्यार्थ्यांची निवड उपांत्यपूर्व परीक्षेसाठी करण्यात आली.
या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या वतीने चेन्नई येथे तब्बल २१ दिवस अर्थ सायन्स विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर, या २२ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये यश प्राप्त करून महाराष्ट्रामधून सहभागी होण्याचा मान अमरजित याने पटकावला.
दरम्यान, जपान येथे झालेल्या अंतिम परीक्षेत चमकदार कामगिरी करीत अमरजित याने भारताला रजतपदकाची कमाई करून दिली. त्याच्या या यशासाठी मदत करणाऱ्या ‘जिआॅलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया’ या बंगलोर येथील संस्थेचे आणि त्याच्या चेन्नई येथील ‘अण्णा विद्यापीठा’च्या प्राध्यापिका हेमा अच्चुभन यांचेदेखील त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Amarjeet Pandeya silver in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.