अंबरनाथ पालिकेत 306 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; घनकचरा शुल्कास नगरसेवकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 08:05 PM2018-01-29T20:05:44+5:302018-01-29T20:14:22+5:30
अंबरनाथ पालिकेचा करवाढीसह सादर करण्यात आलेला 306 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला.
अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेचा करवाढीसह सादर करण्यात आलेला 306 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला. यांदा पालिकेने या अर्थसंकल्पात घनकचरा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या शुल्कास सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला. अंबरनाथ पालिकेने आधी कच-यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी आणि नंतरच घनकचरा शुल्क नागरिकांकडुन कराच्या स्वरुपात घ्यावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. तर शिवसेना नगरसेवकांनी वाढलेल्या कराबाबतच नाराजी असुन हा कर कसा कमी करता येईल यावर विचार करावा अशी मागणी केली. करवाढीचा मुद्दा वगळता पालिकेचा 306 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात मंजुर करण्यात आला.
अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी 2018-19चा अर्थसंकल्प नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांच्याकडे सादर केला. स्थायी समितीमध्ये सुधारणा केलेला हा अर्थसंकल्प पालिकेच्या सर्वसाधारन सभेत अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सविस्तर चर्चा न करता ओघम चर्चा करण्यातच नगरसेवकांनी धन्यता मानली. रस्ते निधी, काँक्रिटचा निधी, महत्वकांशी प्रकल्पांच्या निधीव्यतिरीक्त कोणत्याच विषयांवर सविस्तर चर्चा झाली नाही. अवघ्या दोन तासात ही सभा गुंडाळुन अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला. आधीच्या अर्थसंकल्पात ज्या विषयांवर आर्थिक तरतुद करण्यात आलेली होती, त्या विषयांवरील खर्च का झाला नाही याचा साधा प्रश्न देखील कोणत्या नगरसेवकांनी उपस्थित केला नाही. गेल्या अर्थसंकल्पात सीसीटीव्ही कॅमे-यांसाठी केलेली आर्थिक तरतुद ही खर्च का झाली नाही यावर देखील चर्चा झाली नाही. अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करुन मंजुरी मिळणो अपेक्षित असतांना नगरसेवकांनी ओघम चर्चा करुनच हा अर्थसंकल्प मंजुर केला.
अंबरनाथ पालिकेने मंजुर केलेल्या अर्थसंकल्पात वर्षभरात महसुली उत्पन्नात 152 कोटी 91 लाख प्रस्तावित केली आहे. तर भांडवली उत्पन्नात 129 कोटी 59 लाखांची तरतुद करण्यात आलेली आहे. गेल्या अर्थसंकल्पातील प्रारंभिक शिल्लक ही 23 कोटी 94 लाख दर्शविण्यात आलेली आहे. उत्पन्नाची बाजू पाहता 306 कोटी 46 लाख उत्पन्न दर्शविण्यात आलेले आहे. त्यात खर्चाची बाजी पाहता महसुली खर्च 117 कोटी 93 लाख तर भांडवली खर्च 188 कोटी 33 लाख दर्शविण्यात आलेली असुन 19 लाख 16 हजारांचा शिलकी अर्थसंकल्प मंजुर करण्यात आलेला आहे.
महसुली उप्तन्नात मालमत्ता करापासुन मिळणारे उत्पन्न 37 कोटी दर्शविण्यात आले आहे. तर शासनाने वसुल केलेल्या कराचा आणि शुल्काचा हिस्सा म्हणून प्राप्त होणारा निधी 8 कोटी 58 लाख, शासनाकडुन महसुली अनुदाने आणि अंशदाने आणि अर्थसहाय्य म्हणून 66 कोटी 35 लाख, नगरपरिषदेच्या मालमत्तांपासुन मिळणारे उत्पन्न 1 कोटी 47लाख, फी व वापर आणि द्रव्यदंड यातुन 9 कोटी 56 लाख, विकास अधिभार फी 23 कोटी 50 लाख गृहीत धरुन 152 कोटी रुपये उत्पन्न दर्शविण्यात आले आहे
भांडवली उत्पन्नात 14 वा वित्त आयोग मुलभूत अनुदानातुन 25 कोटी, 14वा वित्त आयोग कार्यात्मक अनुदान 14 कोटी, प्रधानमंत्री आवास योजना 5 कोटी, नागरी दलित वस्ती सुधार योजना 4 कोटी, अमृर योजना 20 कोटी, जिल्हा नियोजन विकास निधी 50 लाख, नवीन अगिAशमन केंद्रासाठी अनुदान 50 लाख, रस्ते विकास अनुदान 65 लाख, स्टेडीयम बांदणो 25 लाख, वैशिष्टयपूर्ण अनुदान 5 कोटी, प्राप्त ठेवी अनामत व शासनाच्या वतीने केलेली वसुली 27 कोटी असे 129 कोटी 59 लाख रुपये उत्पन्न दर्शविण्यात आले आहे.
पालिकेच्या वर्षभरातील महसुली खर्चामध्ये प्रकल्प सल्लागार फीसाठी दिड कोटी, कंसल्टन नेमणूक दिड कोटी, इमारतीची देखभाल दुरुस्ती 50 लाख, शाळांची देखभाल दुरुस्ती 70 ख, वडवली मार्केट दुरुस्ती 45 लाख, कुपनलिका व विहीर देखभाल दुरुस्ती 40 लाख, गटार दुरुस्ती दिड कोटी, भुयारी गटार दुरुस्ती 3 कोटी, नाले दुरुस्ती 57 लाख, नाले सफाईसाठी 50 लाख, जुने रस्ते देखभाल दुरुस्ती 2 कोटी 50 लाख, शुटिंग रेंजसाठी 1 कोटी, पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती 2 कोटी 70 लाख, आग सुरक्षा निधी खर्च 6 कोटी, औषधे खरेदी 55 लाख, जंतूनाशके खरेदी 1 कोटी, घनकचरा वाहतुक आणि शौचालय धुलाई खर्च 2 कोटी, घनकचरा प्रकल्पातील कामे 1 कोटी, महिला बालकल्यानासाठी 3 कोटी 69 लाख, अपंगांसाठी राखिव निधी 2 कोटी 21 लाख, मालमत्ता सव्र्हेक्षण करणो 1 कोटी खर्च दर्शविण्यात आला आहे.
भांडवली खर्चात यंदाच्या वर्षात अनेक महत्वांची कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत. विकास आराखडय़ातील रस्ते बनविणो, काँक्रिटीकरण, डांबरीकरण व जुने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करणो यासाठी 18 कोटींची भरीव तरतुद करण्यात आलेली आहे. विकास आराखडय़ाव्यतिरीक्त रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 8 कोटी, रस्ते बांधणीसाठी 5 कोटी, गटारे बांधण्यासाठी 3 कोटी, नाले बांधणीसाठी सव्वा कोटी, शौचालयांसाठी 1 कोटी 25 लाख, वृक्षारोपणासाठी 90 लाख, उद्यानांसाठी 8क् लाख, शिवमंदिर प्रोजेक्टसाठी 25 लाख, स्मशानभूमी बांधणो 50 लाख,आरक्षणो विकसीत करणो 2 कोटी, नाटय़गृहासाठी 1 कादटी 25 लाखांची तरतुद, समाज मंदिर बांधने 1 कोटी, दुर्बल घटकांसाठी 3 कोटी 69 लाख, प्रभागातील कामे 5 कोटी, गॅस शवदाहीनीसाठी 25 लाख, नवीन पोल्स व हायमास्टसाठी 2 कोटी 50 लाख, दलित वस्तीसाठी 4 कोटी, 14 वा वित्त आयोजाचा खर्च 25 कोटी, 14वा वित्त आयोगातील कार्यात्मक अनुदान 12 कोटी 85 लाख, प्रशासकीय इमारतीसाठी 2 कोटी, अमृत योजनेतुन भुयारी गटारासाठी 20 कोटी असा खर्च अपेक्षित धरण्यात आले आहे.