ओमान येथे अडकलेल्या अंबरनाथच्या महिलेची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:04 AM2018-05-12T03:04:22+5:302018-05-12T03:04:22+5:30

नोकरीच्या आशेने परदेशात जाणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेदा एजंटमार्फत परदेशात विशेषत: आखाती देशात गेलेल्यांना फसवणूक आणि छळाचा सामना करावा लागतो.

Amarnath's woman, rescued from Oman, is rescued | ओमान येथे अडकलेल्या अंबरनाथच्या महिलेची सुटका

ओमान येथे अडकलेल्या अंबरनाथच्या महिलेची सुटका

Next

मुंबई : नोकरीच्या आशेने परदेशात जाणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेदा एजंटमार्फत परदेशात विशेषत: आखाती देशात गेलेल्यांना फसवणूक आणि छळाचा सामना करावा लागतो. अशाच पद्दतीने मस्कत, ओमानमध्ये अडकून पडलेल्या अंबरनाथ येथील महिलेची राज्य महिला आयोग आणि परराष्ट्र मंत्रालयाने सुटका केली.
आर्थिक अडचणीमुळे अंबरनाथ येथील फरीदा खान २७ जानेवारी २०१८ ला नोकरीसाठी दुबईत गेल्या. एजंटमार्फत दुबईला गेलेल्या खान यांचा त्यानंतर परिवाराशीच संपर्क तुटला. त्यामुळे पती अब्दुल अजीज खान यांनी महिला आयोगाच्या ह्यसुहिताह्ण (७४७७७२२४२४) या हेल्पलाईनवर आपली व्यथा मांडत, मदतीचे आवाहन केले. महिला आयोगाने याची दखल घेत परराष्ट्र खात्याकडे पाठपुरावा केला. ओमान येथील भारतीय दूतावासाने ओमान येथील एजंटकडे याबाबत चौकशी सुरु केली. त्यानंतर फरीदा खान यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आणि १ मे च्या रात्री त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले.
फरीदा खान यांना दुबईवरून मस्कतला पाठविण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी त्यांचा छळ होत होता. शिवाय, पासपोर्ट व इतर कागदपत्र जप्त केल्याने त्यांचे परतीचे मार्ग ही बंद झाले होते. परदेशातील या छळामुळे फरिदा खान मानसिकदृष्टया खचल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकप्रकारच्या बंदिवासात अडकलेल्या फरिदा खान यांची महिला आयोग आणि परराष्ट्रा खात्यामुळे सुटका झाली. त्याबद्दल फरिदा खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. अनेक महिला नोकरीसाठी दुबई, मस्कतला जातात. मात्र त्यांना गुलामासारखी वागणूक दिली जाते. या छळात सापडलेल्या अन्य महिलांनाही सोडवावे अशी विनंती खान यांनी यावेळी केली.
याबाबत बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या कि, ह्यसुहिताह्ण या नव्यानेच आयोगाने सुरु केलेल्या हेल्पलाइनवर ही तक्रार आली होती. आयोगाने परराष्ट्र मंत्रालयामार्फत सर्वतोपरी मदत केली आणि आज फरीदा परत आपल्या २ मुली आणि पतीसोबत आहेत. भविष्यात अशा घटनांचा महिलांना सामना करावा लागू नये यासाठी आयोग परराष्ट्र मंत्रालयासोबत काम करणार आहे. तसेच महिलांची फसवणूक करणा-या एजंट विरोधात ही कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सूचना देण्यात येतील.

Web Title: Amarnath's woman, rescued from Oman, is rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.