कल्याण जनता बँकेच्या अध्यक्षपदी आंबेकर, उपाध्यक्षपदी फाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:40+5:302021-03-04T05:16:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : दि कल्याण जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सचिन आंबेकर, तर उपाध्यक्षपदी डॉ. रत्नाकर फाटक यांची ...

Ambekar as the Chairman of Kalyan Janata Bank, Phatak as the Vice-Chairman | कल्याण जनता बँकेच्या अध्यक्षपदी आंबेकर, उपाध्यक्षपदी फाटक

कल्याण जनता बँकेच्या अध्यक्षपदी आंबेकर, उपाध्यक्षपदी फाटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : दि कल्याण जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सचिन आंबेकर, तर उपाध्यक्षपदी डॉ. रत्नाकर फाटक यांची एकमताने निवड झाली आहे.

बँकेच्या संचालक मंडळाची २०२१ ते २०२६ सालाची पंचवार्षिक निवडणूक २८ फेब्रुवारीला झाली. २ मार्चला निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात आले. जनता पॅनलचे सर्व उमेदवार या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाले. नव्या संचालक मंडळाची पहिली सभा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्यालयात झाली. या सभेत सर्व संचालकांनी एकमताने बँकेच्या अध्यक्षपदी सचिन आंबेकर तर, उपाध्यक्षपदी डॉ. रत्नाकर फाटक यांची निवड केली आहे.

आंबेकर हे कल्याण परिसरातील प्रथितयश लेखा परीक्षक असून २००७ पासून बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून काम पाहात आहेत. तर, फाटक हे २०१५ पासून बँकेचे संचालक म्हणून काम पाहात आहेत. तसेच दोघेही कल्याण परिसरात सार्वजनिक कामात सक्रिय आहेत.

बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि मावळते अध्यक्ष ॲड. सुरेश पटवर्धन म्हणाले, आंबेकर आणि फाटक यांच्या नेतृत्वाखाली बँक अधिक वेगाने पुढे जाईल. बँकेच्या भागधारकांनी जनता पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

बँकेचे संचालक मंडळ

दि. कल्याण जनता सहकारी बँकेचे वर्ष २०२१ ते २०२६ या पाच वर्षांसाठी संचालक म्हणून अॅड. सुरेश पटवर्धन, मधुसूदन पाटील, सचिन आंबेकर- अध्यक्ष, डॉ. संदीप जाधव, डॉ. रत्नाकर फाटक- उपाध्यक्ष, पद्मनाभ जोशी, हेमंत दरगोडे, यशवंत पांगारकर, पंकज दांडेकर, मकरंद केळकर, शशिकांत आंधळे, मिलिंद नाईक, डॉ. वैदेही दफ्तरदार, ॲड. संपदा कुलकर्णी काम पाहणार आहेत.

---------------

Web Title: Ambekar as the Chairman of Kalyan Janata Bank, Phatak as the Vice-Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.