अंबरनाथमध्ये पावसात पाणी तुंबण्याची परंपरा कायम; पहिल्याच पावसात तारांबळ
By पंकज पाटील | Updated: June 20, 2024 19:03 IST2024-06-20T19:03:41+5:302024-06-20T19:03:54+5:30
शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग ग्रीन संकुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला

अंबरनाथमध्ये पावसात पाणी तुंबण्याची परंपरा कायम; पहिल्याच पावसात तारांबळ
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा करण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पुन्हा एकदा पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते.
शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग ग्रीन संकुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अंबरनाथ शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसात कल्याण बदलापूर रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी जो कळवड अडथळा निर्माण करीत होता तो कलवड काढल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले नाही मात्र दुसरीकडे अंबरनाथ पूर्व भागात निसर्ग संकुल समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गृह संकलन उभे राहत असताना अनेक गृह संकुलांनी नाले अरुंद केल्यामुळेच पाणी साचत आहे.