VIDEO: अंबरनाथमध्ये लहान मुलांना नग्न करून अमानुष मारहाण; शहरात संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:43 PM2021-02-20T14:43:35+5:302021-02-20T14:51:09+5:30

काठीने अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर; विक्षिप्त व्यक्तीविरोधात अंबरनाथमध्ये संतापाची लाट

in Ambernath man brutally beats two children video goes viral | VIDEO: अंबरनाथमध्ये लहान मुलांना नग्न करून अमानुष मारहाण; शहरात संतापाची लाट

VIDEO: अंबरनाथमध्ये लहान मुलांना नग्न करून अमानुष मारहाण; शहरात संतापाची लाट

Next

अंबरनाथ: अवघ्या १२ ते १३ वर्षांच्या दोन लहान मुलांना नग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ आता समोर आला असून या प्रकारामुळे अंबरनाथ शहरात संतापाची लाट उसळली आहे. (man beats two children in ambernath)

अंबरनाथच्या पश्चिम भागातील चिंचपाडा खदान परिसरातला हा व्हिडीओ असल्याचं व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट होतं आहे. या व्हिडिओत चाचू नावाचा एक विक्षिप्त इसम एका लहान मुलाला काठीने अमानुषपणे मारहाण करत आहे. लाथाबुक्क्या, काठीने या मुलाच्या पायावर, हातावर, डोक्यात, पोटात, इतकंच नव्हे तर गुप्तांगावरही मारहाण करण्यात आल्याचं दिसत आहे. यावेळी हा मुलगा गयावया करत मारू नका, अशी विनवणी करताना दिसत आहे. तर चाचू या इसमाने मात्र इतक्यावरच न थांबता या मुलाला कपडे काढायला लावत नग्न अवस्थेत तो राहत असलेल्या परिसरापर्यंत चालायला लावलं.



चाचू नावाने उल्लेख होत असलेल्या या विक्षिप्त इसमाचं खरं नाव बाबू गुंडे असं आहे. त्याने मुलींची छेड काढत असल्याच्या संशयावरून या मुलांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अंबरनाथ शहरात संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या मुलांना इतकी अमानुष मारहाण होऊनही पोलिसांनी बाबू गुंडे उर्फ चाचू विरोधात अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. त्याच्यावर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्याची मागणी आता केली जात आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस आता तरी काही करतात का? हे आता पाहावं लागणार आहे.

Web Title: in Ambernath man brutally beats two children video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.