अंबरनाथ एमआयडीसीची जलवाहिनी फुटली
By पंकज पाटील | Published: January 17, 2024 06:26 PM2024-01-17T18:26:21+5:302024-01-17T18:26:37+5:30
आज सकाळच्या सुमारास फॉरेस्ट नाका परिसरातील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतून खाजगी विकासकाला देण्यात आलेल्या लाईन मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली.
अंबरनाथ: अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे उंच फवारे हवेत उडत होते. आज सकाळच्या सुमारास फॉरेस्ट नाका परिसरातील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतून खाजगी विकासकाला देण्यात आलेल्या लाईन मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली.
तब्बल 25 ते 30 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. ज्या ठिकाणी पाण्याला गळती लागली होती त्याच्या वरतीच वीज वितरण कंपनीची मुख्य जलवाहिनी गेल्याने काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच एमआयडीसी आणि खाजगी विकास यांनी ही जलवाहिनी बंद करून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. रस्त्याच्या शेजारीच हा प्रकार घडल्याने उंच उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्याखाली गाडी धुण्याचा आनंद वाहनचालक घेत होते.