अंबरनाथ : विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ट्रेलरने घेतला पेट; ट्रेलरच्या चालकाचा जागीच मृत्यू

By पंकज पाटील | Published: May 26, 2023 10:34 AM2023-05-26T10:34:17+5:302023-05-26T10:34:53+5:30

या ट्रेलरचा चालक विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Ambernath: Trailer catches fire after coming in contact with electric wires; The driver of the trailer died on the spot | अंबरनाथ : विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ट्रेलरने घेतला पेट; ट्रेलरच्या चालकाचा जागीच मृत्यू

अंबरनाथ : विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ट्रेलरने घेतला पेट; ट्रेलरच्या चालकाचा जागीच मृत्यू

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथच्या कोणार्क बिजनेस पार्क परिसरात एका ट्रेलरचा उच्च दाबाच्या वाहिनीशी संपर्क झाल्याने तो ट्रेलर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. तर या ट्रेलरचा चालक विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

 शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास अंबरनाथमध्ये एक ट्रेलर कोणार्क बिजनेस पार्क परिसरात वजन काट्यावर वजन करण्यासाठी आला होता. त्यानंतर हा ट्रेलर पुन्हा कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर परतत असताना बिजनेस पार्कच्या कमानी जवळ असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीशी या ट्रेलरचा संपर्क झाला. त्यात विजेचा धक्का लागून ट्रेलरच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. तर विजेचा संपर्कात आल्याने ट्रेलर ने देखील पेट घेतला.

या आगीत ट्रेलर पूर्णपणे जळाले असून अंबरनाथ अग्निशामक दलाने ही आग पंधरा मिनिटात आटोक्यात आणली. मात्र विजेचे उच्च दाबाची विद्युत वाहिनी एवढ्या खाली आलीच कशी असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Ambernath: Trailer catches fire after coming in contact with electric wires; The driver of the trailer died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.