Ambernath: रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे हटविले

By पंकज पाटील | Published: April 13, 2023 06:23 PM2023-04-13T18:23:03+5:302023-04-13T18:23:28+5:30

Ambernath News: रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारून ती जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईत १५ घरे आणि २५ गळ्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे.

Ambernath: Unauthorized constructions removed for road widening | Ambernath: रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे हटविले

Ambernath: रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे हटविले

googlenewsNext

- पंकज पाटील
अंबरनाथ - रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारून ती जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईत १५ घरे आणि २५ गळ्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे.

नियमित कारवाई होऊन देखील अंबरनाथ मधील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. असाच प्रकार शहराच्या पूर्व भागातील प्राचीन शिवमंदिरच्या मागून रिलायन्स रेसिडन्सीकडे जाणाऱ्या १८ मीटर रस्त्यांवर मागील काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामे निर्माण झाल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभी राहिली असल्याने या ठिकाणची रहदारी देखील वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने हा रस्त्यावरील तब्बल १५ निवासी घरे आणि २५ वाणिज्य गाळे भुईसपाट केली आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रम विरोधी पथकाचे प्रमुख संदीप कांबळे, क्षेत्र अधिकारी सुनील गावित, बांधकाम विभागाचे इंजिनिअर राजेश तडवी यांच्या टीमने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी धडक कारवाई करत बाधित रस्त्यातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमुळे १८ मीटर रुंद रस्त्यातील ५०० मीटर लांबी असलेल्या रस्त्यातील साधारण ३०० मीटर लांबीचा रस्ता मोकळा झाला असल्याने लवकरच या रस्ताचे काँक्रीटीकरण एमएमआरडीए कडून करण्यात येईल. त्यासाठी साधारण दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.  

Web Title: Ambernath: Unauthorized constructions removed for road widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.