अंबरनाथ अनधिकृत मोबाईल टॉवरला पालिकेने केले सील; पालिका आणि पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई
By पंकज पाटील | Updated: August 25, 2023 19:00 IST2023-08-25T18:45:27+5:302023-08-25T19:00:48+5:30
या तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने संबंधित मोबाईल टॉवरला नोटीस बजावली होती.

अंबरनाथ अनधिकृत मोबाईल टॉवरला पालिकेने केले सील; पालिका आणि पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने पश्चिम भागातील एका अनधिकृत मोबाईल टावर व कारवाई केली आहे स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा भागात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या विरोधात या परिसरातील सोसायटीच्या सदस्यांनी पालिकेकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने संबंधित मोबाईल टॉवरला नोटीस बजावली होती. मात्र तरी देखील मोबाईल टॉवर बंद न केल्याने अखेर पालिकेने या मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित करत हा मोबाईल टॉवर सील केला आहे. ही कारवाई करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त घेतला होता. पालिकेने एका मोबाईल टॉवरवर कारवाई केली असली तरी शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. त्या संदर्भात तक्रारी देखील करण्यात आले आहेत. मात्र त्या मोबाईल टॉवरवर अद्यापही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शहरातील सर्वच अनधिकृत मोबाईल टॉवरवर योग्य ती कारवाई करण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.