अंबरनाथचे बारवी धरण कोणत्याही क्षणी भरणार, दरवाजे आपोआप उघडणार; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

By सुरेश लोखंडे | Published: July 27, 2023 04:30 PM2023-07-27T16:30:31+5:302023-07-27T16:39:57+5:30

सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढ होत आहे.

Ambernath's barvi dam will fill at any moment, the gates will open automatically; Vigilance warning for villages under the dam | अंबरनाथचे बारवी धरण कोणत्याही क्षणी भरणार, दरवाजे आपोआप उघडणार; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

अंबरनाथचे बारवी धरण कोणत्याही क्षणी भरणार, दरवाजे आपोआप उघडणार; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

ठाणे : जिल्हह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पाणी पुरवठा करणाºया धरणांच्या पाणलोटातही या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तानसा धरणाच्या पाठोपाठ आता बारवी धरण कोणत्याही क्षणी भरून त्याचे ११ स्वयंचलित दरवाजे (वक्र व्दारे) आपोआप उघडणार आहेत. सध्या या धरणाची पाणी पातळी ७०. ८० मीटर झाली आहे. सततच्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी ७२.६० मीटर होताच धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडल्या जाणार आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग होऊन धरणाखालील पाण्याचा वेग वाढणार. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाखालील व बारवी नदी काठावरील शहरांसह १२ गांवपाड्यांना सतर्कतचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे.

सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. या धरणाची उच्चतम विसर्ग पाणी पातळी ७२.६० मी. होताच धरणाचे ११ स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार आहे.त्यामुळे बारवी नदीच्या या धरणाखाली पाण्याचा प्रवाह वाढून त्याचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून या धरणाखालील व नदी काठावरील तब्बल १२ गांवाना सतर्कतेचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे. सद्यस्थितीतील अतिवृष्टीमुळे या धरण परिसरातील उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नसल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कधीही ७२.६० मी. तलांक गाठुन स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडले जाणार आहे. त्यामुळे बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सुरु होऊ शकतो.'

बारवी नदीच्या तीरावरील विशेषत: अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोयाचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींना गांवातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे एमआयडीसीने सुचीत केले आहे. या कालावधीत कोणीही नागरीक, ग्रामस्था आणि पर्यटकांनी नदीच्या पात्रात उतरू नये. पोहण्यास मज्जाव करण्याचा सूचना या एमआयडीसीच्या बारवी धरण कार्यकारी अभियंता यांनी जारी केल्या आहेत.

धरणातील पाणी साठा व टक्केवारी-
 भातसा धरणात  ६०२.८० (६३.९८ टक्के) दशलक्ष घनमीटर (दलघमी.) बारवीत  २८७.२२ (८५ टक्के) दलघमी. पाणी साठा झाला. आंध्रा धरणात २१६.५१ (६३.८४ टक्के)दलघमी साठा मध्ये वैतरणात १३७ (७०.७९ टक्के) दलघमी तर अप्पर वैतरणात १७९.५३ (५४.१९ टक्के) दलघमी साठा आहे. मोडक सागरमध्ये ११७.९६ (९१.४९ टक्के) दलघमी  पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.

Web Title: Ambernath's barvi dam will fill at any moment, the gates will open automatically; Vigilance warning for villages under the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.