अंबरनाथचा काकोळे पूल धोकादायक, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:02 AM2022-03-28T09:02:27+5:302022-03-28T09:02:43+5:30

अपघाताची भीती : नवीन पूल उभारण्याची स्थानिकांची मागणी

Ambernath's Kakole bridge is dangerous, fear of accident | अंबरनाथचा काकोळे पूल धोकादायक, अपघाताची भीती

अंबरनाथचा काकोळे पूल धोकादायक, अपघाताची भीती

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क 
अंबरनाथ : अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडणारा आणि काटई नाका ते कर्जतकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील काकोळे गावचा पूल धोकादायक झाला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याठिकाणी नवीन पूल उभारावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

काटई नाक्यावरून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग हा अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडला आहे. या एमआयडीसीजवळ काकोळे गाव असून, राज्य महामार्गावरून काकोळे वळणावर उभारलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाखालून वालधुनी नदी वाहत असून,हा पूल कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या राज्य महामार्गाचे काम करताना कर्जत दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पूल उभारण्यात आला असून,काटई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल अजूनही तसाच ठेवण्यात आला आहे. 

वास्तविक,या पुलाचीही नव्याने उभारणी करणे गरजेचे होते. मात्र,निधीअभावी या पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तो धोकादायक ठरवावा आणि त्या ठिकाणी नव्याने पूल उभारावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. जर वाहतूक सुरु ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सळ्या गंजल्या, काँक्रिटचा थर निखळला 
राज्य महामार्गावरील वालधुनी नदीवरील हा पूल महत्त्वपूर्ण असून,त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वेळीच नवीन पूल उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. या पुलावरील लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजल्या असून,अनेक ठिकाणी काँक्रिटचा थर निखळून पडला आहे. या पुलावर अनेकवेळा अपघात घडले असून, ते टाळण्यासाठी नवीन पूल बांधणे हा एकमेव पर्याय आहे.

Web Title: Ambernath's Kakole bridge is dangerous, fear of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे