अंबिका, वृंदावन सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:53 AM2020-02-23T00:53:08+5:302020-02-23T00:53:16+5:30
मालमत्ताकरात सूट; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : केडीएमसीच्या क्षेत्रात कचºयाची विल्हेवाट आणि वर्गीकरण ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ‘ग’ प्रभागक्षेत्रातील अंबिका आणि वृंदावन सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण आणि खतनिर्मिती होत आहे. त्यामुळे या सोसायट्यांना महापालिकेच्या सुविधेप्रमाणे मालमत्ताकरात पाच टक्के सूट देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले.
घनकचरा विघटन विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड यांनी शुक्रवारी दोन्ही सोसायट्यांची पाहणी केली. तसेच श्रीखंडेवाडीमधील एका लग्नाच्या हॉलची पाहणी केली. लग्न हॉलच्या व्यवस्थापकांनी पाच प्रकारांत कचरा वर्गीकरण केले आहे. खाद्यपदार्थ बनवणाºया व्यावसायिकांसाठी तो प्रकल्प आदर्श ठरावा, अशी त्याची रचना करण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले. तिन्ही ठिकाणी कचºयाचे योग्य पद्धतीने वर्गीकरण केले जाते, खतनिर्मितीही केली जात आहे. महासभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार अशा सोसायट्यांना मालमत्ताकरामध्ये पाच टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. असे उपक्रम राबवणाºया विविध सोसायट्यांची माहिती घेऊ न त्यांनाही मालमत्ताकरात सूट देण्यात येणार असल्याचे जोशी म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत कचरानिर्मूलन निरीक्षक वसंत देगलूरकरही उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाºया सोसायट्यांनी त्यांच्या कचºयाची विल्हेवाट त्यांनी स्वत: लावावी. प्लास्टिकचा कमीतकमी वापर करण्याचे आवाहन करावे आणि मालमत्ताकरांमध्ये पाच टक्केसूटचा लाभ घ्यावा.
- उमाकांत गायकवाड, उपायुक्त, घनकचरा विघटन विभाग, केडीएमसी