आंबिवली - नांदकर रहिवाशांना मिळणार होडी

By Admin | Published: November 2, 2016 05:01 PM2016-11-02T17:01:03+5:302016-11-02T17:01:03+5:30

कल्याण व भिवंडी तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या ब्रिटिश कालीन पत्री लोखंडी पुल पडल्याने येथील हजारो नागरिकांच्या ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे.

Ambivali - Nandkar residents will get the ride | आंबिवली - नांदकर रहिवाशांना मिळणार होडी

आंबिवली - नांदकर रहिवाशांना मिळणार होडी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. 02 - कल्याण व भिवंडी तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या ब्रिटिश कालीन पत्री लोखंडी पुल पडल्याने येथील हजारो नागरिकांच्या ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. याची पहाणी करण्यासाठी भिवंडी आमदार शांताराम म्हात्रे  व शिवसेना जिल्हा प्रमुख   प्रकाश पाटील यांनी भेट दिली. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था म्हणून होडी साठी आठ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रधान देखील येथील ग्रामस्थ व उपसरपंच मनोज पाटील यांना दिले आहे.
 गेली कित्येक वर्षां पासून सदर पुलावर येथे 15 ते 20 गावातील हजारो लोक ये-जा करत आहेत.  परंतू दिवाळी सणाच्या दिवशीच हा पुल पडला असल्याने या लोकांचा येण्या जाण्याचा मार्गच बंद झाला आहे. याची पहाणी करण्यासाठी भिवंडी आमदार शांताराम म्हात्रे व शिवसेना जिल्हा प्रमुख  प्रकाश पाटील भेट दिली. यावेळी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात या लोकांना ये-जा करण्यासाठी होडीची व्यवस्था व्हावी म्हणून आठ लाख रूपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांना पत्र दिला आहे.  

Web Title: Ambivali - Nandkar residents will get the ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.