श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून कोल्हापूरकरांना रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:38 PM2020-09-10T23:38:09+5:302020-09-10T23:38:19+5:30
छत्रपती संभाजी राजे यांनी ४ सप्टेंबरला ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
कल्याण : कोल्हापूरमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने एक सुसज्ज रुग्णवाहिका तेथील छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनला देण्यात आली आहे. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी संभाजीराजे यांना सुपूर्द करण्यात आली.
छत्रपती संभाजी राजे यांनी ४ सप्टेंबरला ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यावर उपाययोजना करण्यासंबंधात चर्चा केली. तसेच विविध मागण्या केल्या होत्या. कोल्हापुरास एक सुसज्ज रुग्णवाहिका देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली होती. या चर्चेनंतर रुग्णवाहिका देण्याचा शब्द शिंदे यांनी दिला होता. तो शब्द मंत्री शिंदे यांनी खरा केला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तसेच मदत कक्षाच्या कोविड वॉर रूमचे कौतुक केले. तसेच संभाजीराजे फाउंडेशनच्या वतीनेही अशाच प्रकारचे वैद्यकीय मदत केंद्र सुरू करण्याचा मानस संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.