अखेर दिवा स्थानकाला मिळणार रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 08:04 PM2018-10-23T20:04:53+5:302018-10-23T20:05:32+5:30

रेल्वे पोलीस सूत्रांची माहिती; दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची होती मागणी

The ambulance will finally get to the Diva station | अखेर दिवा स्थानकाला मिळणार रुग्णवाहिका

अखेर दिवा स्थानकाला मिळणार रुग्णवाहिका

Next

अनिकेत घमंडी

डोंबिवली - दिवारेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा असूनही या स्थानकातील गैरसोयींकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवा ते कळंबोली कोकण रेल्वे मार्गावर आणि मुख्य मार्गावर रेल्वे अपघातांची संख्या लक्षणिय असूनही येथे पूर्ण वेळ रुग्णवाहिका नसल्याने प्रवाशांची हेळसांड होत असल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने वेळोवेळी झालेल्या अपघातानंतर रेल्वेच्या नीदर्शनास आणले होते. त्याची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत या स्थानकातही रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांना सोमवारी पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली. भगत हे मध्य रेल्वेच्या उपनगरिय रेल यात्री उपभोक्ता समितीचे सदस्य असून त्यांनी यासंदर्भात रेल्वे अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकांमध्ये आवाज उठवला होता. भगत म्हणाले की, अपघात कमी होत नाहीतच, पण अपघातानंतर जखमींना अथवा मृतांना तातडीने वैद्यकिय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिके आभावे ताटकळावे लागते. त्यामुळे अनेकदा जखमी प्रवाशांचे विव्हळणे बघवत नाही, अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांच्या जिविताचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी या ठिकाणी रुग्णवाहिका असणे आवश्यक होते. लोहमार्ग पोलिस सूत्रांच्या माहितीनूसार रेल्वेने दिवा स्थानकात ती सुविधा देण्याचे मान्य केले आहे. लवकरच या ठिकाणीही वाहन उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आॅक्टोबरमध्ये दिव्यातील रेल्वे अपघात
* ७ आॅक्टोबर - आगासन फाटक जवळ एकाला एक्सप्रेस ची धडक, रुग्णवाहिका नसल्याने मृतदेह टेम्पोमध्ये टाकून दिवा स्थानकात आणला गेला पुढे लोकल ने सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे रवाना.
* १५ आॅक्टोबर - कळंबोली- दिवा दरम्यान जवळ झालेल्या अपघातात रुग्णवाहिका नसल्याने ८ तास मृतदेह ताटकळला. ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस मृतदेह अगोदर दिवा रोहा पॅसेंजरने व नंतर लोकलने हॉस्पिटल मध्ये पोहचवला.
* २२ आॅक्टोबर - दोन बहिणींना जलद लोकलची धडक, तब्बल एक तासांनी जखमी महिलेला सकाळी ८:१८ च्या लेडीज स्पेशल लोकल ने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Web Title: The ambulance will finally get to the Diva station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.