रुग्णवाहिकांचे बिघडले ‘गणित’

By admin | Published: December 12, 2015 12:52 AM2015-12-12T00:52:50+5:302015-12-12T00:52:50+5:30

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) २,४०३ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. मात्र, ही आकडेवारी मागील ३० ते ४० वर्षांपासूनची असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली

Ambulances 'math' | रुग्णवाहिकांचे बिघडले ‘गणित’

रुग्णवाहिकांचे बिघडले ‘गणित’

Next

पंकज रोडेकर,  ठाणे
ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) २,४०३ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. मात्र, ही आकडेवारी मागील ३० ते ४० वर्षांपासूनची असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या तरी दोन्ही जिल्ह्यात किती रुग्णवाहिका धावतात हे सांगता येणार नाही. मात्र, दुसरीकडे ठाणे शहरात जवळपास ६० ते ७० रुग्णवाहिका धावत असतील, अशी शक्यताही या सूत्रांनी वर्तवली आहे.
हा स्फोट झाला तेंव्हा रूग्णवाहिका बंद होती. त्यामुळे ते वाहन दोषी असेल असे प्राथमिकदर्शी तरी वाटत नाही. परंतु, जर सिलेंडरचा स्फोट झाला असेल तर त्या सिलेंडरला सीसीओईची मान्यता होती का? हे तपासण्याची गरज असल्याचे मत एका आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.
वर्तकनगर येथे झालेल्या
दुर्देवी घटनेनंतर लोकमतने रूग्णवाहिकांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही
जिल्ह्यांत २,४०३ रूग्णवाहिकांची नोंदणीअसल्याची बाब समोर आली. यामध्ये ठाणे विभागात १५५७ ,कल्याणात ४०२ आणि नवी मुंबई २८९ तसेच वसईत १५५ रूग्णवाहिका आहेत. या रूग्णवाहिका डिझेल-पेट्रोल आणि सीएनजीवर धावतात. तसेच नामंकित संस्थांच्या मान्यतेनुसारच या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रानुसार त्या रस्त्यांवर येतात.
तसेच त्यांची निगा ही प्रामुख्याने त्या मालकाने राखण्याची गरज असते. तर आरटीओकडे तपासणीसाठी आल्यानंतर त्या वाहनांना योग्यतेबाबत प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच अपघातग्रस्त वाहन नवी मुंबई पासिंगचे असून ते वाहन जुलै २०१४ मधील आहे. तसेच घटना घडली
तेव्हा ते बंद होते. त्यामुळे त्यामध्ये दोषी असे वाटत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Ambulances 'math'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.