महावितरणच्या संपाचा बदलापूरकरांना झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:07 AM2019-01-09T04:07:17+5:302019-01-09T04:07:33+5:30
ग्राहक दहा तास अंधारात : कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा, क्षुल्लक कारणामुळे बिघाड
बदलापूर : सलग तीस तासांच्या पाणीकपातीमुळे त्रस्त असलेल्या बदलापूरकरांच्या त्रासात सोमवारी महावितरणाच्या संपाची भर पडली. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख नागरिकांना सोमवारची रात्र अंधारात काढावी लागली. रात्री साडेदहाच्या सुमारास झालेला क्षुुल्लक तांत्रिक बिघाड संपावर असलेल्या कर्मचाºयांनी दुरूस्त न करता थेट पहाटेपर्यंत वाट पाहिली. त्यामुळे महावितरणाच्या कर्मचा-यांविरूद्ध बदलापूरमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बदलापूर आणि अंबरनाथमध्ये या आठवडयापासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारच्या पहाटे पाणी येणार नसल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण होते. त्यात सोमवारी सुरू झालेल्या महावितरणाच्या कर्मचाºयांच्या संपाचा बदलापूरकरांना फटका बसला. बदलापूर पश्चिमेत सायंकाळी सात ते आठ आणि पुढे साडेदहानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सकाळी साडेआठ पर्यंत सुरळीत झाला नव्हता. ऐन झोपेच्यावेळी खंडीत झालेल्या या वीजपुरवठयाबाबत तक्र ार करण्यासाठी असलेला दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत होती. सकाळीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली होती. अखेर साडेआठच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.
च्मोरिवली येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती नंतर महावितरणचे अभियंते देत होते.
च्मात्र यामुळे तब्बल दहा तास दीड लाख बदलापूरकर अंधारात होते. तर बदलापूर पूर्वेतल्या औद्योगिक क्षेत्रालाही याचा फटका बसला. क्षुल्लक दुरूस्तीचे काम न केल्यामुळे संपूर्ण रात्र बदलापूरकरांना अंधारात काढावी लागली.