ऑनलाईन गुंतवणुकीत फसगत झालेली ५ लाखांची रक्कम मिळाली
By धीरज परब | Published: March 24, 2024 11:28 AM2024-03-24T11:28:58+5:302024-03-24T11:30:41+5:30
५ लाख रुपये परत मिळवून देण्यात मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याला यश आले आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - जास्त पैश्यांच्या आमिषाने ऑनलाईन गुंतवणूक करून ८ लाखांची फसगत झालेल्या महिलेस त्यातील ५ लाख रुपये परत मिळवून देण्यात मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याला यश आले आहे .
दलाल आडनावाच्या महिलेस ऑनलाईन गुंतवणुकीत चांगला फायदा करून देण्याचे आमिष दाखवून सायबर लुटारूंनी त्यांची ऑनलाईन ८ लाख ३ हजार रुपयांना फसवणूक केली होती . सायबर पोलीस ठाणे येथे त्यांची तक्रार आल्या नंतर १७ डिसेम्बर २०२३ रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर सह प्रविण आव्हाड, गणेश ईलग, पल्लवी निकम,प्रशांत बोरकर, प्रविण सांवत व सोनाली मोरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले . दलाल यांची फसगत झालेली रक्कम ज्या विविध बँक खात्यात जमा होती ती गोठवण्यासाठी पत्रव्यवहार करत ५ लाखांची रक्कम गोठवण्यात यश आले . ठाणे न्यायालयाच्या आदेशाने ५ लाखांची रक्कम दलाल यांच्या बँक खात्यात पुन्हा वळती करण्यात आली .