उल्हासनगर महापालिकेचा अमृत कलश दिल्लीला जाणार, आयुक्त अजीज शेख यांच्याकडून कलशचे पूजन

By सदानंद नाईक | Published: October 27, 2023 03:03 PM2023-10-27T15:03:05+5:302023-10-27T15:03:38+5:30

अमृत कलश दिल्ली येथे जाणार असून त्यासाठी एका टीमची घोषणा आयुक्त यांनी केली आहे. 

Amrit Kalash of Ulhasnagar Municipal Corporation will go to Delhi, Kalash will be worshiped by Commissioner Aziz Shaikh | उल्हासनगर महापालिकेचा अमृत कलश दिल्लीला जाणार, आयुक्त अजीज शेख यांच्याकडून कलशचे पूजन

उल्हासनगर महापालिकेचा अमृत कलश दिल्लीला जाणार, आयुक्त अजीज शेख यांच्याकडून कलशचे पूजन

 उल्हासनगर: माझी माती, माझा देश या उपक्रमा अंतर्गत शहरातील माती व तांदुळाने भरलेल्या अमृत कलशाला निरोप देण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते गुरवारी कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. अमृत कलश दिल्ली येथे जाणार असून त्यासाठी एका टीमची घोषणा आयुक्त यांनी केली आहे. 

उल्हासनगर महापालिकेने माझी माती, माझा देश या उपक्रमा अंतर्गत प्रभाग समिती कार्यालयातील अधिकारीने कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन माती व तांदूळ अमृत कलशात जमा केली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात सर्व कलश एकत्र आणून त्या कलशातील काही प्रमाणात मातीं व तांदूळ एका मुख्य कलशात एकत्र केली. त्या मुख्य कलशाची आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते गुरवारी विधिवत पूजा करून कलश दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, प्रियांका रजपूत यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 महापालिकेचा अमृत कलश प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर आजाद मैदान मुंबई येथे नेण्यात येणार आहेत. २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी सदरचे अमृत कलश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वरील अधिकारी यांचे समवेत दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. अमृत कलशाचे महापालिकेतून निर्गमनाचे वेळी सुरक्षा विभागामार्फत परेड घेऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी महापालिकेचे सहायक संचालक नगररचनाकार ललीत खोब्रागडे, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकणों, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, निलम कदम, श्रध्दा बाविस्कर, अंकुश कदम, दिप्ती पवार, विशाखा सावंत, अलका पवार, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विनोद केणे, राजेश घनघाव, बाळू नेटके, सचिन वानखेडे व महापालिकेचे सर्व विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Amrit Kalash of Ulhasnagar Municipal Corporation will go to Delhi, Kalash will be worshiped by Commissioner Aziz Shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.