भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ 

By नितीन पंडित | Published: January 30, 2024 05:35 PM2024-01-30T17:35:16+5:302024-01-30T17:36:20+5:30

लोकसभा निवडणुकीच्या वारे वाहु लागल्याने राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणादेखील कमला लागली आहे.

An increase of 97 thousand 742 voters in three assembly constituencies in bhiwandi | भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ 

भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ 

नितीन पंडित, भिवंडी: लोकसभा निवडणुकीच्या वारे वाहु लागल्याने राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणादेखील कमला लागली आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात सुमारे ९८ हजार नव्या मतदारांची भर पडली आहे.भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात भिवंडी पश्चिम (१३६) मध्ये व भिवंडी पूर्व (१३७) मध्ये तर ग्रामीण तालुक्यात भिवंडी ग्रामीण (१३४) मध्ये असे तीन विधानसभा मतदारसंघ असून या तिन्ही मतदारसंघात एकूण ९७ हजार ७४२ नव्या मतदारांची भर पडली आहे.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात १६ हजार २६४ नव्या मतदारांची वाढ झाली आहे.ज्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष मतदारां पेक्षा अडीच पट अधिक आहे. २०१९ मध्ये २ लाख ७५ हजार ८४३ मतदार नोंद होते.तर २०२४ मध्ये ४८०७  पुरुष, ११४०५ स्त्रिया तर ५२ इतर  यांची वाढ होऊन २०२४ मध्ये मतदार संख्या २ लाख ९२ हजार १०७ वर पोहचली आहे.
          
भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात २० हजार ७०७ मतदारांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये २ लाख ९६ हजार ६३९ मतदार नोंद होते. तर २०२४ मध्ये ९५७२  पुरुष,११ हजार ७१ स्त्रिया तर ६४ इतर  यांची वाढ होऊन २०२४ मध्ये मतदार संख्या ३ लाख १७ हजार ३४६ वर पोहचली आहे.

भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदार संघात ६० हजार ७७१ मतदारांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये २ लाख ५४ हजार ३८४ मतदार नोंद होते.त्यामध्ये २०२४ मध्ये २८ हजार ८९८ पुरुष, ३१ हजार ८६३ स्त्रिया तर १० इतर यांची वाढ होऊन २०२४ मध्ये मतदार संख्या ३ लाख १५ हजार १५५ वर पोहचली आहे.एकूण तालुक्याचा विचार केल्यास या तिन्ही मतदार संघ मिळून ४३ हजार २७७ पुरुष व ५४ हजार ३३९ स्त्रिया व १२६ इतर मतदारांची वाढ झाली आहे .

Web Title: An increase of 97 thousand 742 voters in three assembly constituencies in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.