रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 18:26 IST2022-06-04T18:23:55+5:302022-06-04T18:26:23+5:30
Accident Case : रस्ता ओलांडणाऱ्या दोंडे यांना अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू
ठाणे : घोडबंदर रोड ओवळा नाका येथे रस्ता ओलांडताना एका अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत ओवळा नाका येथील विलास रामकृष्ण दोंडे (७९) हे पादचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
रस्ता ओलांडणाऱ्या दोंडे यांना अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.