भुमिगत विद्युत केबलला आग; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात एकाचा मृत्यू
By कुमार बडदे | Updated: March 10, 2023 09:12 IST2023-03-10T09:12:27+5:302023-03-10T09:12:44+5:30
आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यातून निघणारे धुराचे लोट एक ते दोन किलो मीटर वरुन दिसत होते.

भुमिगत विद्युत केबलला आग; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात एकाचा मृत्यू
मुंब्राः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील शिळफाटा परीसरातील एका हाँटेल समोरील भुमिगत विद्युत केबलला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यातून निघणारे धुराचे लोट एक ते दोन किलो मीटर वरुन दिसत होते.
या घटनेत एका विद्युत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला असून, यामध्ये एका टायरच्या दुकानात झोपलेल्या व्यक्तीचा घटनास्थळावर मृत्यू झाला आहे. घटनास्थळी विद्युत पुरवठा करणाऱ्या टोरंट कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच ठामपाच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तीन फायर वाहन, दोन वाँटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोहचले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यावस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.