आनंद परांजपे यांचा वागळेमध्ये झंझावात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 15:14 IST2019-04-20T15:09:51+5:302019-04-20T15:14:58+5:30

या निवडणूक प्रचार रॅलीच्या वेळी  हजारो स्थानिक नागरिक तसेच महिलांची मोठयासंखेने उपस्थिती होती. 

Anand Paranjape woke up in Wagle! | आनंद परांजपे यांचा वागळेमध्ये झंझावात !

आनंद परांजपे यांचा वागळेमध्ये झंझावात !

ठळक मुद्दे या रॅलीमध्ये महिलांची लक्षणिय उपस्थिती पहायला मिळाली.चौकाचौकात आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी जोरदार स्वागत केले.

ठाणे - शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वागळे इस्टेट येथे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा झंझावात पहावयास मिळाला. या निवडणूक प्रचार रॅलीच्या वेळी  हजारो स्थानिक नागरिक तसेच महिलांची मोठयासंखेने उपस्थिती होती. 

सत्ताधारी शिवसेनेने दुर्लक्षित केलेल्या विकासामुळे  वागळे इस्टेट परिसरातील नागरीक हैराण झाल्याने आनंद परांजपे यांच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासन देण्यात आले. ही प्रचार रॅली कशिष पार्क, रहेजा गार्डन, रघुनाथ नगर, हाजुरी, काजूवाडी-वैतीवाडी, रामचंद्र नगर, ज्ञानेश्वर नगर, अंबिका नगर, कामगार रुग्णालय, इंदिरा नगर, डवले नगर,सावरकर नगर, महात्मा फुले नगर, परिसरात फिरविण्यात आली. 

दिवंगत माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे चिरंजीव आनंद परांजपे हे निवडणूक लढवत असल्याने आनंद हे प्रकाश परांजपे यांच्या स्वरुपात नागरिक, मतदार पाहत होते. अभ्यासू, निष्कलंक, संसदेचा अनुभव असलेला उमेदवार आनंद परांजपे यांना निवडून दिलेच पाहिजे अशी चर्चा रॅली दरम्यान नागरिकांमध्ये  रंगली होती. चौकाचौकात आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी जोरदार स्वागत केले. या रॅलीमध्ये महिलांची लक्षणिय उपस्थिती पहायला मिळाली.

या प्रचार रॅलीमध्ये ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, काँग्रेसचे नेते जे.बी.यादव,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमित सरैय्या ठाणे काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनाने, जोती निंबर्गी, पटेल भाबी, अजय वडावकर, नितीन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Anand Paranjape woke up in Wagle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.