फोटो, मजकूर व्हायरल : बदनामीविरोधात अनासपुरे यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 00:35 IST2019-08-03T00:34:45+5:302019-08-03T00:35:02+5:30
फोटो, मजकूर व्हायरल : कासारवडवली पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो, मजकूर व्हायरल : बदनामीविरोधात अनासपुरे यांची तक्रार
ठाणे : सोशल मीडियावर फोटो आणि मजकूर व्हायरल करून अभिनेते मकरंद अनासपुरे यांची बदनामी करणाऱ्या अनोळखी आरोपींविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. अनासपुरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
घोडबंदर रोड येथील रहिवासी असलेले सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचे असंख्य चाहते आहेत. वर्षभरापासून त्यांच्या छायाचित्रांना मॉर्फ करून फेसबुकवर वादग्रस्त मजकूर व्हायरल केले जात आहे. एवढ्या दिवस हा विनोदी मजकूर असल्यामुळे अनासपुरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण, मार्च ते जुलै २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये राजकीय स्वरूपाचा तसेच समाजात गैरसमज निर्माण करणारा मजकूर फेसबुकद्वारे प्रसारित होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी गंभीर दखल घेत गुरुवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले.