चिखलगावातील प्राचीन शिल्पे नष्ट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2015 03:55 AM2015-07-23T03:55:05+5:302015-07-23T03:55:05+5:30

शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून चार किमी अंतरावर असणाऱ्या चिखलगावमध्ये असणारी प्राचीन दगडी शिल्पे स्थानिक ग्रामस्थ

Ancient Shrines of Chikhalgawa will be destroyed? | चिखलगावातील प्राचीन शिल्पे नष्ट होणार?

चिखलगावातील प्राचीन शिल्पे नष्ट होणार?

Next

धसई : शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून चार किमी अंतरावर असणाऱ्या चिखलगावमध्ये असणारी प्राचीन दगडी शिल्पे स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शिल्पांचे पुरातत्त्व खात्याकडून संशोधन करावे, अशी मागणी काही ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सुमारे ३५० लोकवस्ती असणाऱ्या चिखलगाव या महसूली गावापासून एक किलोमीटरवर जंगलात पांडवकालीन भवानीदेवीची मूर्ती व २०-२५ दगडी शिल्पे दोन किमीच्या परिघात पसरलेली आहेत. देवीच्या मूर्तीची ऊन-पावसात हेळसांड होऊ नये म्हणून चिखलगावकरांनी गेल्या वर्षीच जंगलात मूर्तीच्या ठिकाणी मंदिर उभारले आहे. मात्र, इतस्तत: पसरलेली ही दगडी शिल्पे अनेक वर्षांपासून ऊन -वारा-पाऊस यांच्या माऱ्याने झिजत आहेत.
उभट आयताकृती दगडांवर घोड्यावर बसलेले शस्त्रधारी सैनिक, सिंहासनावर बसलेला राजा व सेवक, संभाषण करणारे स्त्री-पुरु ष, एकामागे एक जाणारे घोडेस्वार अशी चित्रे कोरलेली असून बरीच चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत. ही शिल्पे केव्हा कोरली गेली असावीत, याची माहिती माझ्या आजोबांनासुद्धा नव्हती, इतकी ती जुनी आहेत, अशी माहिती या गावातील ७५ वर्षे वय असलेले ज्येष्ठ नागरिक केशव बाबू देसले यांनी दिली. मीनल चव्हाण माध्यमिक विद्यालय, चिखलगावचे मुख्याध्यापक कैलास धनाजी देसले यांनी या शिल्पांचे संशोधन व जतन व्हावे, याकरिता प्रयत्न सुरू केले असून पुरातत्त्व विभाग व ऐतिहासिक वस्तू व वास्तूंच्या संशोधनकार्यात रस असणाऱ्या तज्ज्ञांनी येथे भेट देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत, शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना विचारले असता हे काम पुरातत्त्व विभागाने करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. हे कोरीवकाम व भवानीची मूर्ती पांडवकालीन असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाने पावले न उचलल्यास ही दुर्मीळ शिल्पे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Ancient Shrines of Chikhalgawa will be destroyed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.