... आणि अश्विनी जोशींनी व्यक्त होणे टाळलेच!

By admin | Published: May 2, 2016 01:13 AM2016-05-02T01:13:20+5:302016-05-02T01:13:20+5:30

सत्ताधारी भाजपाच्याच खासदार-आमदारांच्या तक्रारी आणि कारवाईमुळे दुखावलेल्या वेगवेगळ््या माफियांच्या तक्रारींमुळे ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदावरून मुदतीपूर्वीच

... and Ashwini Joshi avoided expressing! | ... आणि अश्विनी जोशींनी व्यक्त होणे टाळलेच!

... आणि अश्विनी जोशींनी व्यक्त होणे टाळलेच!

Next

ठाणे : सत्ताधारी भाजपाच्याच खासदार-आमदारांच्या तक्रारी आणि कारवाईमुळे दुखावलेल्या वेगवेगळ््या माफियांच्या तक्रारींमुळे ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदावरून मुदतीपूर्वीच बदली झालेल्या अश्विनी जोशी यांनी आधी पत्रकार परिषद रद्द केली; नंतर रविवारी भाजपाच्या आंबा महोत्सवालाही हजर न राहता बदलीबाबत व्यक्त होणे टाळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बदली होताच दुसऱ्या दिवशी जोशी पत्रकार परिषद घेतील असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र नंतर कोणतेही कारण न देता ती पुढे ढकलण्यात आली. दुसऱ्या दिवशीही त्यांनी पत्रकारांना सामोरे जाणे टाळले. शिवाय पदाची सूत्रेही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोपविली.
त्यांच्या बदलीमागे असलेले भाजपाचे नेते, त्यांच्या आशीर्वादाने फोफावलेले बांधकाम, भू रेती, गोदाम माफिया यांच्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील, यामुळेच जोशी यांनी माध्यमांसमोर येणे टाळल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात होती.
त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांच्या पुढाकाराने होणाऱ्या आंबा महोत्सवाला त्या नक्की येतील, असे त्या पक्षातर्फेे सांगितले जात होते. त्यामुळे महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी त्या जिल्ह्यातील अनुभवांबद्दल बोलतील, अशी अपेक्षा होती.
मात्र बदलीनंतरच्या शिष्टाचाराचे कारण देत त्यांनी तेथे उपस्थित
न राहता व्यक्त होणे टाळले. (प्रतिनिधी)

Web Title: ... and Ashwini Joshi avoided expressing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.