..आणि नारायण सुर्वेंचा जाहीरनामा प्रेक्षकांसमोर उलगडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 06:46 PM2018-05-01T18:46:21+5:302018-05-01T18:46:21+5:30
कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.
कल्याण - कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा-या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड, प्रवास कवितेचा’ या कार्यक्रमाचे.
सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कोलाज यांच्यातर्फे कामगार दिनाच्या पूर्व संध्येला सार्वजनिक वाचलनालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी गीतेश शिंदे, उमेश जाधव, आदित्य दवणो, वृषाली विनायक यांनी कविवर्य सुव्रे यांच्या कविता आणि कामगार चळवळीतील गीते सादर केली. त्याच बरोबर मार्क्सवादी विचारांची जोड असणा-या कविता ही सादर केल्या. रिवाईंड : प्रवास कवितेचा या कार्यक्रमातून एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येतो. यापूर्वी दिवंगत कवी निरंजन उजगरे यांनी अनुवादित केलेल्या कवितांवर प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यांच्या पुढील टप्प्यात काल सोमवारी कवि नारायण सुर्वे यांचा कवितेचा प्रवास सादर करण्यात येत आहे. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, मिलींद कुलकर्णी, भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
आदित्य दवणो यांनी ‘माङो विद्यापीठ’ही कविता सादर केली. ही कविता फार मोठी असल्याने त्यातील निवडक भाग सादर करण्यात आला. उमेश जाधव यांनी ‘तर समज’ ही कविता सादर केली. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. गीतेष शिंदे यांनी ‘विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘सत्य’ या शीर्षकातील ‘तुङो गरम ओठ ओठावर टेकल्यास तेव्हा’ आणि व्हिजीट ही कविता सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झाला तेव्हा जन्मला आलेले गीत सादर करण्यात आले. हे गीत शाहीर अमरशेख यांचे असल्याचे गीतप्रेमींना वाटत होते. पण तसे नव्हते. या गीतांने सुव्रे प्रसिध्दीच्या झोतात आले. ‘डोंगरी शेत गं बाई मी बेनू किती’ हे गीत उमेश जाधव यांनी सादर करून प्रेक्षकांची टाळ्य़ाच्या कडकडाटात दाद मिळविली. गीतेष आणि वृषाली यांनी ‘मार्क्स मला भेटला’ ही कविता सादर केली. आदित्य यांनी ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवाह ची दाद मिळविली. उमेश यांनी ‘काय ते पत्रत लिवा’, प्रौढ स्त्रीचे दुख मांडणारी ‘तिने खरकटी काढली’आणि गिरणीची लावणी ही चळवळतील गीतं सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला. वृषाली यांनी निवेदनांसोबतच मनीऑर्डर मधील व्यक्तीचित्रण आणि मर्ढेकरांशी बातचीत या कविता सादर केल्या. गीतेशने लाईनमनच्या आयुष्यावरील कबुत:या , विश्वास ठेव या कविता सादर केल्या.
कार्यक्रमांचे प्रास्तविक राजीव जोशी यांनी केले. भिकू बारस्कर यांनी वाचनलयाची भूमिका मांडत आभारप्रदर्शन केले. सर्व कलाकरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन सत्कार करण्यात आला. कोलाजतर्फे लवकरच आणखी एका ज्येष्ठ कवींचा साहित्यीक प्रवास उलगडण्यात येणार आहे, अशी माहिती गीतेश शिंदे यांनी दिली.