... आणि ठाण्यात रानटी सरडयाला मिळाले जीवदान....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 11:47 PM2021-05-03T23:47:23+5:302021-05-03T23:48:52+5:30

सुमारे एक फूट लांबीचा हा सरडा (इंडियन चामलेन्स) मासुंदा तलावासमोरील रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या कक्षाच्या पथकाने तातडीने सरडयाच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली.

... and the wild squirrel got life in Thane .... | ... आणि ठाण्यात रानटी सरडयाला मिळाले जीवदान....

ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली धाव

googlenewsNext
ठळक मुद्दे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जांभळी नाका येथील चिंतामणी ज्वेलर्स चौकाजवळील रस्त्याच्या कडेला एक रानटी सरडा गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धाव घेत या सरडयाला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सुमारे एक फूट लांबीचा हा सरडा (इंडियन चामलेन्स) मासुंदा तलावासमोरील रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या कक्षाच्या पथकाने तातडीने सरडयाच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. तेंव्हा त्याच्या डाव्या पायाला मार लागल्याचे आढळले. त्याला कोकणीपाडा येथील वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या अ‍ॅनिमल ट्रान्सिट सेंटर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर आता उपचार सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

Web Title: ... and the wild squirrel got life in Thane ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.