नोव्हेबरपासून रखडलेल्या मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा ठाणे जि.प.वर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 07:06 PM2020-01-03T19:06:27+5:302020-01-03T19:11:45+5:30

ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनासाठी व प्रशासनाच्या ...

Anganwadi servicemen march on Thane Z.p. for the honors kept from Novber | नोव्हेबरपासून रखडलेल्या मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा ठाणे जि.प.वर मोर्चा

अंगणवाडी सेविका मोर्चाच्या निष्टमंडळाने जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील व अन्य पदाधिकारी

Next
ठळक मुद्दे जिल्हा भरातील सेविकांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला.मोर्चा पोलिस आयुक्तालयापासून पुढे शासकीय विश्रामगृहासमोर आडवण्यात आलाकोण म्हणतो देणार नाय... घेतल्या शिवाय राहणार नाय

ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनासाठी व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सुरू असलेली उपासमार, आर्थिक समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी हा मोर्चा काढून सेविकांनी ठाणेजिल्हा परिषदेच्या प्रशासनास धारेवर धरले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची भेट घेऊन मोर्चेकर सेविकांनी मागण्याचे निवेदन दिले.
      महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरातील सेविकांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला. महागिरी येथून निघालेला हा मोर्चा पोलिस आयुक्तालयापासून पुढे शासकीय विश्रामगृहासमोर आडवण्यात आला. या मोर्चाचे येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी या कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी उपस्थित सेविकांना मार्गदर्शन केले. प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे,यासाठी ८ जानेवारीच्या देशपातळीच्या संपात सहभाग घेऊन मंत्रालयावर धडक देण्याचेही पाटील यांनी सेविकांना सांगितले. या नवीन सरकारमधील महिला बालविकास मंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय जागेवरून हटणार नसल्याचा निर्धारही पाटील यांनी सेविकांच्या तोंडून वळवून घेतला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह, राजेश सिंह यांनीही उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले.
       यावेळी सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून या मोर्चात सहभाग घेतला होता. मागण्या मान्य झाल्यास पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय... खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतो देणार नाय... घेतल्या शिवाय राहणार नाय आदी घोषणा देत सेविकांनी शासकयी विश्रामगृह समोरील परिसर दणाणून सोडला. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या सर्व सेविकांना शासकीय दर्जा द्या,मानसेवी असे गोंडस नाव देऊन सेविकांकडून अल्पशा मानधनावर काम करून घेतल्या जात असल्याचा अन्याय तत्काळ दूर करा,नोव्हेबरपासून रखडलेल्या मानधनाची रक्कम तातडीने अदा करावी, सेविकांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी प्रत्येक महिन्या एक तारखेला मानधन द्या, सेविकेला तृतीय श्रेणी व मदतनीसला चतुर्थ श्रेणीचे वेतन व सेवेचे फायदे द्या. मानधनात भरघोस वाढ करा, निवृत्तीच्या दिवशी मिळालेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन देण्याचा निर्णय घ्या, आजारपणाची रजा लागू करा,लाभार्थ्यांच्या आहारचे पैसे अ‍ॅडव्हान्स द्या आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेला यावेळी देण्यात आले.

 

Web Title: Anganwadi servicemen march on Thane Z.p. for the honors kept from Novber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.