अंगणवाडी सेविकांचा मोबाइल ‘हॅंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:29 AM2021-01-10T01:29:35+5:302021-01-10T01:29:52+5:30

जिल्ह्यातील वास्तव : नेटवर्कची समस्या, मानधन, रिचार्जसाठी पैशांची चणचण

Anganwadi worker's mobile 'hangs' | अंगणवाडी सेविकांचा मोबाइल ‘हॅंग’

अंगणवाडी सेविकांचा मोबाइल ‘हॅंग’

googlenewsNext

ठाणे :  जिल्ह्यातील गाव, पाडे आणि खेडी आदींमध्ये बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यासह त्यांच्या सुदृढ आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात एक हजार ८५४ अंगणवाडीसेविका काम करीत आहेत. केंद्रातील रोजच्या विविध कामांची नोंद त्यांना मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन नोंदवावी लागत आहे. पण  रिचार्जसाठी लागणाऱ्या पैशांची चणचण, नेटवर्कअभावी या सेविकांचा मोबाइल सध्या जिल्हाभर हँग झाल्याचे वास्तव ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

सेविकांना केंद्रात उपस्थित बालकांसह त्यांना वाटप केलेला पोषण आहार, त्यास अनुसरून केलेल्या कामांची व रोजच्या कामांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी मोबाइल ॲपवर त्यांची ऑनलाइन नोंद करीत आहेत. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने खास सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे. या सेविका अल्पमानधनावर इंग्रजीतील सॉफ्टवेअरवर कामांची नोंद करून प्रत्येक दिवसाच्या कामाचा अहवाल प्रशासनाला देत आहेत. या कामासाठी आर्थिक पाठबळ शासनाकडून वेळेवर मिळत नाही. तरीgh त्या मुलांना रोज देण्यात येत असलेल्या पोषण आहार वाटपात खंड पडू देत नाहीत. 

अडचणी काय !
गांवपाड्यांना मोबाइल नेटवर्कची  समस्या आहे. मानधनाची रक्कम, मोबाइल रिचार्जसाठी ऑगस्टपासून पैसे मिळालेले नाहीत. या सेविका उच्चशिक्षित नसतानाही त्यांना मोबाइल ॲपद्वारे इंग्रजीतील तक्त्यांमध्ये विविध माहिती भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. 

अंगणवाडीसेविकांना वेळेवर मानधन मिळावे!
अंगणवाडीसेविकेला वेळेवर, दरमहा मानधन मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळवून देण्यासाठी व त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमच्या पातळीवर निश्चितच प्रयत्न करतो.
    - सुभाष पवार उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

मोबाइलवरून कोणती कामे करावी लागतात?
n सर्व घरातील बालके, महिला आणि इतर सदस्यांविषयीची माहिती जतन करणे आणि अद्यावत करीत राहणे.
n अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षांच्या बालकांची दैनिक उपस्थिती, दैनदिन उपक्रम. 
n अंगणवाडी क्षेत्रातील कार्य आणि आहाराचा मोगावा घेत राहणे.
n गर्भवती, स्तनदा माता आणि २ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी गृहीभेटीचे नियोजन.
n बालकांच्या वजनांची नोंद करणे. वाजवीपेक्षा कमी वजन आपोआप दर्शविणे.
n लाभार्थ्यांना भविष्यातील व्हीएचएनडीविषयी सूचना देण्यासाठी लाभार्थ्यांची यादी करणे. व्हीएचएनडी दिवशी लसीकरण डेटाची नोंदणी करणे.
nअंगणवाडी सुरू असल्याबाबतची स्थिती, उपस्थिती आणि आहार वितरणाचा शोध घेण्यासाठी फॉर्म.
 

Web Title: Anganwadi worker's mobile 'hangs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.