अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा; ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:19 AM2019-06-08T00:19:53+5:302019-06-08T00:20:02+5:30

राज्य शासनाने सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होईल, असे आश्वासन दिले होते

Anganwadi workers' umbrella front; Thane collector beaten at office | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा; ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा; ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

Next

ठाणे : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाºयांनी छत्री मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. राज्य शासनाने सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, मानधनात १५०० रुपये, छोट्या अंगणवाडीसेवकांच्या मानधनात १२५० रु पये, तर मदतनिसांच्या मानधनात ७५० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंगणवाडीसेविकांना ५०० रु पये आणि मदतनिसांना २५० रु पये प्रोत्साहनभत्ता देण्यात आला आहे. आॅक्टोबर २०१८ पासून लागू झालेली मानधनवाढ अधिक प्रवासभत्ता अंगणवाडी कर्मचाºयांना दिलेला नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अंगणवाडी कर्मचाºयांनी सरकारने मानधनवाढीची रक्कम २०१८ पासूनच्या फरकासह द्यावी. शासकीय कर्मचाºयाचा दर्जा देऊन वेतन, भत्ते व सेवेचे फायदे देण्यात यावे, या महत्त्वाच्या मागणीसह कर्मचाºयांना सेवानिवृत्त केल्याच्या तारखेपासून मानधनाची जी रक्कम मिळत असेल, त्या रकमेतील ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून द्यावी. सेवानिवृत्तीनंतर एक लाख रु पये रक्कम एप्रिल २०१४ नंतर ज्या कर्मचाºयांची सेवा संपली आहे, त्यांना शासनआदेशानुसार एकरकमी रक्कम तत्काळ देण्यात यावी, तसेच सेवानिवृत्तीचा लाभ म्हणून देण्यात येणाºया लाभामध्ये तीनपटीने वाढ करावी आदी प्रलंबित मागण्यांसाठी हा छत्री मोर्चा काढण्यात आला होता. ११ जूनला मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

Web Title: Anganwadi workers' umbrella front; Thane collector beaten at office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.