रेल्वे सुरक्षा दलासह लोहमार्ग पोलीस प्रवाशांसाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:24 PM2020-12-16T23:24:21+5:302020-12-16T23:24:25+5:30

दोन वर्षांत वाचविले ३४ प्रवाशांचे प्राण

Angels for railway police passengers with railway security forces | रेल्वे सुरक्षा दलासह लोहमार्ग पोलीस प्रवाशांसाठी देवदूत

रेल्वे सुरक्षा दलासह लोहमार्ग पोलीस प्रवाशांसाठी देवदूत

googlenewsNext

ठाणे : कोरोनाचा काळ असो की अन्य कोणतीही नैसर्गिक आपत्ती; या सर्व बाबींचा सामना करण्याबरोबरच रेल्वेच्या संपत्तीची सुरक्षा करण्यासाठी डोळ्यांत तेल घालून अहोरात्र रेल्वे सुरक्षा दलासह लोहमार्ग पोलीस कार्यरत असतात. असे असताना, याच रेल्वे पोलिसांनी अनेक प्रवाशांचे जीव वाचवत त्यांना जीवनदान देण्याचे कार्यदेखील केले आहे. मागील दोन वर्षांत रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ३४ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
रेल्वे प्रवासी, रेल्वे संपत्तीची करण्यात येणारी नासधूस, हिंसा, रेल्वे प्रवासी संघटनांकडून होणारी आंदोलने, रेल्वे प्रवासादरम्यान हरविलेल्या मुलांचा शोध घेणे, स्टेशन परिसरात अमली पदार्थांचे सेवन व विक्री यांसारख्या विविध सुरक्षेबाबत दक्षता घेण्याबरोबरच आवाहनांचा सामनादेखील त्यांना करावा लागत आहे. अशातच मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सकाळ - संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असते. अशा वेळी लोकल ट्रेनमध्ये चढताना - उतरताना प्रवाशांचा पाय घसरून खाली पडणे, धावती लोकल पकडणे अथवा विविध कारणांनी नैराश्यातून आत्महत्या करण्यासाठी आलेल्या व्यक्तींचे प्राण वाचविण्यात रेले सुरक्षा दलाचे जवान अधिक सतर्क आहेत. २०१९ मध्ये २१ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. यामध्ये दादर स्थानकावर सात प्रवाशांचे तर भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कर्जत स्थानकांवर प्रत्येकी दोन जणांचे प्राण वाचविले. तसेच २०२० मध्ये १३ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात आले. यापैकी सहा घटना या कल्याण रेल्वे स्थानकात घडल्या आहेत. या घटना लांब पल्ल्यांच्या ट्रेनने प्रवासादरम्यान घडल्या असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली.

२१ ऑक्टोबरला कल्याण स्टेशनवर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका महिलेला कर्तव्यावर असलेल्या सुश्री पिंकी यांनी ट्रेन पकडण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याकडे लक्ष न देता, ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तोल गेल्याने ती ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये पडली. त्या वेळी क्षणाचाही विलंब न करता सुश्री पिंकी यांनी अन्य प्रवाशाच्या साहाय्याने तिचे प्राण वाचविले. तर नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला सकाळी ९.०५ वाजताच्या दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवासी धावती ट्रेन पकडण्यासाठी जात असताना तोल जाऊन ती रेल्वेखाली येण्याआधीच प्रसंगावधान राखून तिला रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक विजय सोलंकी यांनी वाचविले.

Web Title: Angels for railway police passengers with railway security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.