राेडवर तुंबलेल्या ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे नाैपाडा परिसरात संताप
By सुरेश लोखंडे | Published: April 4, 2023 06:03 PM2023-04-04T18:03:31+5:302023-04-04T18:03:47+5:30
शहरातील गजबजलेल्या व उच्च शिक्षित लाेकाचा परिसर म्हणून नाैपाड्याची ओळख आहे.
ठाणे :
शहरातील गजबजलेल्या व उच्च शिक्षित लाेकाचा परिसर म्हणून नाैपाड्याची ओळख आहे. मात्र येथील इमारतीच्या शाैचालयाचे ड्रेनेज भरल्यामुळे त्याचे पाणी राेडवर वाहत आहे. तर काही तुंबलेले असल्यामुळे येथून येजा करणार्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आधीच विविध आजारांच्या साथीमुळे ठाणेकर हैराण आहेत. त्यात एन्फ्ल्यूएंजा व काेराेना रूग्ण्याची भर पडत असल्यामुळे ठाणेकर आधीच भेदरलेले आहे. त्यात या ड्रेनेजच्या घाण पाण्याचा प्रवाह गाेखले राेडवर असल्यामुळेि तेथील रहिवाश्यासह येजा करणार्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घाण पाण्यास वेळीच आळा घालण्यासाठी येथील जागृक नागरीक महेंद्र माेने यांनी ठाणे महापालिकेला ऑनलाइन तक्रार करून प्रशासनाचे लक्ष त्याकडे वेधले आहे.
बाजारपेठेच्या परिसरात या राेडवर घाणीचे पाणी असल्यामुळे दुर्गंधीमुळे पसरली आहे. येजा करणार्यांना त्यातून मार्ग काढून पुढे जावे लागत आहे. राेडवर डबक्याच्या स्वरूपातही हे घाण पाणी साचलेले आहे. त्यामुळे जीव घेण्या साथीचे आजार हाेण्याची भीती माेने यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली आहे. वेळीच या ड्रेनची सफाई करून पाण्याचा हा प्रवाह राेख्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.