संतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 07:54 PM2018-08-21T19:54:30+5:302018-08-21T19:55:00+5:30
आठवडाभरापासून सुरू असलेल्या फेरीवाला कारवाई विरोधात संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक आक्रमक होत महापालिकेवर धडक दिली.
डोंबिवली - आठवडाभरापासून सुरू असलेल्या फेरीवाला कारवाई विरोधात संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक आक्रमक होत महापालिकेवर धडक दिली. विशेषतः महिला फेरीवाल्यांचा समावेश असल्याने डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर याना मध्यस्थी करावी लागली . महिलांनी सांगितले की १५० मीटर च्या बाहेर देखील बसल्यावर कारवाई होते . तर मग स्थानक परिसरातच का बसू नये इथे आणि तिथे ही आमचे सामान उचलतायच तर मग बसायचे तरी कुठे असा सवाल करताच वाडेकर निरुत्तर झाले
आक्रमक फेरीवाल्याना शांत करताना फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे आणि ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी चरचा केली जर १५० मीटर बाहेर फेरीवाले बसत असतील तर त्यांच्यावर कारवाई करून नये आणि जर १५० मीटर मध्ये बसत असतील तर जरूर कारवाई करा असे कुमावत याना वाडेकर यांनी सांगितले
डोंबिवली पश्चिमेला काही फेरीवाल्यांवर नियमानुसार वागून तराजूत तोडण्यात आल्याची घटना कांबळे यांनी वाडेकर याना सांगितली . त्यावर फेरीवाल्यांनी संताप व्यक्त केला . पण त्यात कुमावत यांनी सावध पवित्रा घेत कुमावत यांनी हात वर केले . महापालिका अधिकाऱ्यानच्या दुट्टपी भूमिकेवर आक्षेप घेत फेरीवाला सगळीकडे सारखाच असे स्पष्ट केले . तणावाची परिस्थिती बघता वाडेकर यांनी आयुक्त गोविंद बोडके हेच पर्याय देऊ शकतात त्यामुळे मुख्यालयात जाऊन तेथे दाद मागावी येथे आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल असे वर्तन करू नये अन्यथा पोलीस देखील कार्यवाही करतील अशी तंबी दिल्यावर तणाव शांत झाला .
पोट भरणे हा आमचा हक्क नाही का ४० वर्षा पासून आम्ही व्यवसाय करतो तरी आम्हला त्रास का असा सवाल महिलांनी केला तसेच कारवाई करताना जर सामान मिळाले तर त्यावर जागीच दंड घेऊन समान सोडावे अशी मागणी फेरीवाल्यांनी केली . तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी तसाच फतवा काढला होते असे कांबळेनी स्पष्ट केले . तसेच सोमवारी आयुक्त बोडके यांनी दिलेल्या शब्दानुसार जर ऑगस्ट महिना अखेरीस आम्हाला जागा दिली नाही तर फेरीवाला शांत बसणार नाही याची नोंद महापालिके सह पोलिसांनी घ्यावी असा इशारा कांबळे यांनी दिला.
फोटो आहेत