विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: संतप्त पालकांचा बदलापुरात 'रेल रोको', लोकल सेवा ठप्प!
By पंकज पाटील | Published: August 20, 2024 10:50 AM2024-08-20T10:50:50+5:302024-08-20T10:51:40+5:30
या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
बदलापूर: बदलापुरातील आदर्श महाविद्यालयात ज्या दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पालकांनी सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
आदर्श महाविद्यालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आज सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करून पोलीस प्रशासनाला चांगलाच घाम फोडला होता. मात्र संतप्त झालेल्या पालकांनी महाविद्यालयाच्या आंदोलनाच्या ठिकाणी काढता पाय घेत रेल्वे स्थानक गाठत बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले. डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेस या सर्व संतप्त आंदोलन कर्त्यांनी रोखून धरली.
विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: संतप्त पालकांचा बदलापुरात 'रेल रोको'#badlapurpic.twitter.com/fnMFilv69g
— Lokmat (@lokmat) August 20, 2024
पालकांचा मोठा समूह थेट रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे प्रशासन देखील सतर्क झाली आहे. पालकांचा संताप अनावर होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रेल रोको मुळे अप मार्गावरील रेल्वे वाहतूक वांगणी स्थानकापर्यंत थांबवण्यात आली आहे तर डाऊन दिशेकडील रेल्वे सेवा अंबरनाथ स्थानकात थांबवण्यात आली आहे.