संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:18 AM2019-06-19T01:18:41+5:302019-06-19T01:18:50+5:30

ठाणे- भिवंडी रस्त्यावर कोंडी; एमएमआरडीएच्या कारवाईचा निषेध

Angry roadmap's 'Rasta Roko' | संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

Next

भिवंडी : तालुक्यातील काल्हेर, कोपर ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या बेकायदा गोदामांच्या इमारतींवर एमएमआरडीएने कारवाई करावी असे आदेश सरकारने दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व गोदाममालक यांनी मंगळवारी काल्हेर रास्ता रोको करत कारवाईस विरोध केला. ग्रामस्थांचा विरोध पाहता एमएमआरडीएचे अतिक्रमण विभागाचे पथक या भागात फिरकलेच नाही. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या रास्ता रोकोमुळे भिवंडी -ठाणे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने गोदाम व्यवसाय वाढला असून नियोजन नसल्याने या भागात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. २००९ मध्ये तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला. त्यानंतर ५१ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील बांधकाम परवानगीचे अधिकार एमएमआरडीएकडे आले. परंतु कोपर , काल्हेर , कशेळी या ग्रामपंचायत बहुतांश क्षेत्रात मोठ्या संख्येने गोदाम संकुले उभारली. दरम्यान एमएमआरडीएच्या कार्यालयातील भूमी व मिळकत शाखा सहायक आयुक्तांनी १५ जून रोजी सूचना काढून कोपर येथील सर्वे क्र. ३० ते ४२ आणि ४८ ते ५६ या शेतजमिनीवर अरिहंत कॉम्प्लेक्स नावाने इमारतींचे बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका ठेवत विकासक संजय देढिया यांना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने हे बांधकाम मंगळवारी पाडणार असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. या घटनेचा धसका घेत परिसरांतील शेतकरी,गोदामधारक व गोदाममालक यांच्यात घबराट पसरली. त्यांनी संघटित होऊन भिवंडी-ठाणे मार्गावरील काल्हेर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

५ ते ६ किलोमीटरपर्यंत रांगा
एमएमआरडीएच्या या निर्णयाविरोधात केलेल्या आंदोलनात कृष्णकांत कोंडलेकर , माजी आमदार योगेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनामुळे भिवंडी-ठाणे मार्गावर पाच ते सहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा होत्या. त्याचा त्रास विद्यार्थी, नोकरदार ांना झाला.

Web Title: Angry roadmap's 'Rasta Roko'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.