अंजूरफाटानाक्याची वाहतूककोंडी फुटणार, चालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:48 PM2019-12-29T22:48:03+5:302019-12-29T22:48:09+5:30
नव्या भुयारी मार्गाला परवानगी; अतिक्रमणे हटवली जाणार, कपिल पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह केली घटनास्थळाची पाहणी
भिवंडी : अंजूरफाटा येथील चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वेमार्गाखाली बांधण्यात येणाºया भुयारी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. भुयारी रस्त्याच्या कामासाठी अतिक्र मणांवरही लवकरच हातोडा पडणार आहे. रेल्वेमार्गाजवळील ७० कुटुंबे ४० वर्षे झोपड्यांमध्ये राहत असून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत शुक्र वारी या ठिकाणची पाहणी केली.
भिवंडी-ठाणे रस्त्यावरील अंजूरफाटा येथील अरु ंद भुयारी रस्त्यामुळे वाहतूककोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनांच्या रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी रुंद भुयारी रस्त्याची मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे २० सप्टेंबर २०१८ रोजी केली होती. त्याचबरोबर अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर, रेल्वे मंत्रालयाने नव्या भुयारी मार्गाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वेचे वरिष्ठ अभियंता डी.डी. लोलगे, वरिष्ठ विभागीय अभियंता संतोषकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता परदेशी, पोलीस निरीक्षक (वाहतूक) कल्याण घेटे, दीपक पाटील आदींनी पाहणी केली. याप्रसंगी अंजूरफाटा येथील पुलाजवळच्या अतिक्रमणांची अधिकाºयांनी पाहणी केली. तसेच कामासाठी जागा मोकळी करण्यासाठी लवकरात लवकर अतिक्र मणे हटविण्याचे निर्देश दिले. या पुलासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार असून रेल्वेमार्गाखाली तयार बॉॅक्स करून टाकण्याचे प्राथमिक नियोजन आहे. त्यानुसार काम होणार आहे.
अंजूरफाटा येथील नव्या रस्त्यामुळे वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. त्यासाठी या पुलाच्या कामासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.