अंनिसचा ‘द...दारूचा नव्हे, द...दुधाचा’; डोंबिवलीत २५ लीटर दूध फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:08 AM2020-01-01T00:08:15+5:302020-01-01T06:48:02+5:30

व्यसनापासून दूर राहण्याचा तरुणाईचा संकल्प

Annis 'the ... not the alcohol, the ... the milk' | अंनिसचा ‘द...दारूचा नव्हे, द...दुधाचा’; डोंबिवलीत २५ लीटर दूध फस्त

अंनिसचा ‘द...दारूचा नव्हे, द...दुधाचा’; डोंबिवलीत २५ लीटर दूध फस्त

Next

डोंबिवली : सरत्या वर्षाला दारू पिऊनच निरोप द्यायचा, असा प्रघात काही वर्षांपासून पडलेला असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ‘द...दारूचा नव्हे, द...दुधाचा’ हा अगळावेगळा उपक्रम मंगळवारी डोंबिवली पश्चिमेत राबवला. यावेळी दारू पिऊ नका, अशी जनजागृती करत समितीने २५ लीटर मोफत मसाला दुधाचे वाटप केले. या उपक्रमाला तरुणांनी चांगला प्रतिसाद देत नव्या वर्षात व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली युवा पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होताना दिसत आहे. अनेक युवक-युवती या दिवशी व्यसनाचा पहिला अनुभव घेताना दिसतात. व्यसनाधीन होणे म्हणजे सारासार विचार करण्याची शक्ती हरवून बसणे. हे ध्यानात घेऊन ‘द दारूचा नव्हे, द.. दुधाचा, चला, व्यसनाला बदनाम करूया’ ही मोहीम समितीतर्फे राबवण्यात आली.

‘हॅपी न्यू इयर...हॅपी न्यू इयर...नो आल्कोहल, नो टोबॅको, नो गुटखा, नो बीअर’ तसेच ‘हॅपी न्यू इयर...हॅपी न्यू इयर..., चला व्यसनाला बदनाम करूया, निरोगी आयुष्याचा स्वीकार करूया,’ अशा घोषणा देत समितीसोबत नागरिकांनी नव्या वर्षाचे स्वागत केले.
या उपक्रमाप्रसंगी समितीच्या राज्य चिटणीस सुरेखा भापकर, डोंबिवली शाखेच्या सचिव किशोरी गरुड, मुकुंद देसाई, शाहीर शिंदे, अशोक आहेर, शुभांगी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, वंचित आघाडीनेही युवकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याची परिसरात चर्चा होती.

Web Title: Annis 'the ... not the alcohol, the ... the milk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.